India Gold demand: ६ वर्षांत पहिल्यांदाच सोन्याच्या मागणीत मोठी घसरण; काय आहे मुख्य कारण?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि देशांतर्गत प्रतिकूल घटकांमुळे २०२६ या वर्षात भारतातील सोन्याची मागणी गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी पातळीवर जाण्याची शक्यता आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodayPudhari
Published on: 
Updated on: 

India Gold demand

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि देशांतर्गत प्रतिकूल घटकांमुळे २०२६ या वर्षात भारतातील सोन्याची मागणी गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'ने (WGC) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही शक्यता वर्तवली आहे. सोन्याच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे दागिन्यांची खरेदी मंदावली असून गुंतवणुकीच्या स्वरूपातील मागणीतही घट झाली आहे.

चीननंतर भारत हा जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढती महागाई आणि सर्वसामान्यांचे कोलमडलेले बजेट यांचा थेट फटका सोन्याच्या बाजाराला बसला आहे. याशिवाय, यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यामुळे ग्रामीण भागातील दागिन्यांची मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे.

Gold Rate Today
Dhanteras Gold Buying 2026: धनत्रयोदशीआधीच सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोनं तब्बल ७ टक्के स्वस्त, काय आहे आजचा भाव?

मागणी ६५० मेट्रिक टनांपर्यंत घटण्याचा अंदाज

'moneycontrol' ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या भारतीय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी माहिती दिली की, वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी खूपच मंदावली आहे. यामुळे २०२६ मधील एकूण मागणी सुमारे ६५० मेट्रिक टनांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. २०२० मधील 'कोविड-१९'च्या टाळेबंदीनंतरची ही सोन्याची सर्वात कमी मागणी ठरेल.

जैन पुढे म्हणाले की, सप्टेंबरच्या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षागणिक २९ टक्क्यांनी घसरून १६२.५ मेट्रिक टनांवर आली आहे. यात दागिन्यांच्या खरेदीत २० टक्के, तर सोन्यातील गुंतवणुकीत तब्बल ४० टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे.

सण-उत्सव आणि लग्नसराईकडून आशा

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. तसेच आगामी लग्नसराईच्या हंगामामुळे डिसेंबरच्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत काही प्रमाणात सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, उच्च दर आणि पावसामुळे घटलेले शेतकऱ्यांचे उत्पन्न यावर मर्यादा आणू शकते. भारताची एकूण सोन्याची मागणी ५०० टक्क्यांहून अधिक ग्रामीण भागातून येते, जिथे सोन्याकडे संपत्तीचे पारंपारिक साधन म्हणून पाहिले जाते.

आयात शुल्कात वाढ अन् अवैध आवक

यंदाच्या पावसाळ्यात गेल्या एका दशकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच, सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे अधिकृत सोन्याच्या आयातीत घट झाली असून, अप्रत्यक्ष व बेकायदेशीर मार्गाने होणाऱ्या सोन्याच्या आवकमध्ये वाढ झाल्याचेही जैन यांनी नमूद केले.

Gold Rate Today
Gold Sweet: सोन्याचा वर्ख असलेल्या मिठाईची दिवाळीत खास क्रेझ; आठ तुकड्यांची किंमत तब्बल दहा हजार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.