Gold Sweet: सोन्याचा वर्ख असलेल्या मिठाईची दिवाळीत खास क्रेझ; आठ तुकड्यांची किंमत तब्बल दहा हजार

कॉर्पोरेट गिफ्ट पॅकपासून शुगरफ्री मिठाईपर्यंत विविध पर्याय बाजारात
Gold Sweet
Gold SweetPudhari
Published on: 
Updated on: 

खांदा कॉलनी: दिवाळीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसतशी पनवेलमधील बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढू लागली आहे. दिवाळी म्हटले की फराळ, फटाके, आकाशकंदील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मिठाईचा गोडवा! यंदाच्या दिवाळीसाठी मिठाईच्या बाजारपेठेतही मोठी तयारी करण्यात आली असून, पारंपरिक मिठाईपासून ते आकर्षक आणि महागड्या प्रीमियम मिठाईपर्यंत अनेक प्रकार ग्राहकांच्या भेटीला आले आहेत.

यंदाच्या दिवाळीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे सोन्याचा वर्ख लावलेली खास मिठाई. या मिठाईची आकर्षक सजावट आणि वेगळेपण ग्राहकांना भुरळ घालत आहे. विशेष म्हणजे या मिठाईच्या केवळ आठ तुकड्यांच्या डब्याची किंमत सुमारे दहा हजार रुपयांच्या घरात आहे.

त्यामुळे मिठाईच्या बाजारपेठेत सध्या या महागड्या मिठाईची विशेष चर्चा रंगू लागली आहे. काही ठिकाणी लाखो रुपयांच्या किमतीचे विशेष मिठाईचे प्रकारही ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

Gold Sweet
Torrent Power Project: सायडोंगर वाचवण्यासाठी महाराष्ट्र एकवटला; टोरेन्ट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

दुसरीकडे, दिवाळीच्या निमित्ताने कंपन्या, कॉर्पोरेट कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये कर्मचारी, अधिकारी तसेच व्यावसायिक भागीदारांना मिठाई भेट देण्याची परंपरा आहे. हीच गरज ओळखून आकर्षक सजावट असलेले विविध प्रकारचे गिफ्ट पॅक बाजारात दाखल झाले आहेत.

छोट्या बॉक्सपासून ते प्रीमियम गिफ्ट हॅम्परपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बदलत्या जीवनशैलीचा विचार करून यंदा शुगरफ्री मिठाईलाही विशेष महत्त्व मिळत आहे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींसह साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी शुगरफ्री मिठाईचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर पारंपरिक साखरेच्या मिठाईलाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

काजू कतली, बदाम बर्फी, पिस्ता रोल, ड्रायफ्रूट मिठाई, मोतीचूर लाडू, बंगाली मिठाई अशा प्रकारांनी मिठाईची दुकाने सजली आहेत. रंग, आकार, चव आणि आकर्षक पॅकिंग यामुळे ग्राहकांचे लक्ष दुकानांकडे वेधले जात आहे. काही कंपन्यांकडून तर दिवाळीच्या भेटवस्तूंच्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी आतापासूनच मिठाईचे गिफ्ट पॅक पाठविण्यास सुरुवात झाली आहे.

Gold Sweet
Saurabh Chandrakar: महादेव बेटिंग अ‍ॅपचा सूत्रधार चंद्राकर ओमानमधून भारतात; रायपूरच्या विशेष न्यायालयात आज हजर करणार

काळ बदलला, मिठाईचे प्रकार बदलले

दिवाळीच्या निमित्ताने एखाद्याच्या घरी मिठाईचा डबा पोहोचवणे म्हणजे केवळ गोड पदार्थ देणे नव्हे, तर नात्यांमधील आपुलकी आणि आनंदाची देवाणघेवाण करणे होय. काळ बदलला, मिठाईचे प्रकार बदलले, पॅकिंगचे स्वरूप बदलले; मात्र दिवाळीच्या गोडव्याची परंपरा आजही कायम आहे.

महागड्या सोन्याच्या वर्खापासून ते घरगुती चवीच्या पारंपरिक मिठाईपर्यंत सर्वच पर्यायांनी पनवेलची बाजारपेठ सजली असून, यंदाची दिवाळी मिठाईच्या गोडव्याने अधिकच खास होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.