E25 Petrol New Rule: जुन्या गाड्यांची पुन्हा भुरभुर...? पेट्रोलमध्ये इथेनॉलचा डोस वाढणार; सरकारनं केलंय पूर्ण प्लॅनिंग

E25 Petrol New Rule
E25 Petrol New Rulepudhari
Published on
Updated on

E25 Petrol New Rule: केंद्र सरकार सध्या भारतातील इथेनॉल ब्लेंडिंगबाबतच्या पुढच्या टप्प्यााबत चाचपणी करत आहे. यानुसार २०२७ मध्ये E21 पेट्रेल आणलं जाईल. त्यानंतर २०२९ मध्ये E25 इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल आणण्याची देखील शक्यता आहे. आधाच देशात E20 पेट्रोल हा वादाचा विषय ठरला आहे. गाड्यांचे मायलेज कमी झाले आहे. गाड्या या पेट्रोलला कम्पॅटेबल असणं हा देखील वादाचा विषय आहे. जुन्या गाडी मालकांसाठी E20 हे पेट्रोल डोकेदुखीच ठरत आहे.

E25 Petrol New Rule
Petrol Excise Duty : केंद्र सरकारकडून इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क रद्द; पेट्रोलची किंमत कमी होणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल बाजारात आणण्याबाबत सरकार कोणताही थेट निर्णय न घेता टप्प्या टप्प्याने पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढवणार आहे. आधी सरकार २०२७ मध्ये E21 पेट्रोल बाजारात आणणार आहे. त्यानंतर २०२९ मध्ये E25 पेट्रोल बाजारात येणार आहे.

सूत्रांनी बिजनेस टुडेला दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करण्याच्या बाबतीत २५ टक्क्यावर कॅप करण्याचा विचार करत आहे. सध्याच्या धोरणानुसार E25 ब्लेंड पेट्रोल हा सर्वोच्च कॅप असणार आहे.

E25 Petrol New Rule
E20 fuel mileage drop : इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होते! केंद्र सरकारची कबुली

सूत्रांनी सांगितलं की, 'पेट्रोलमध्ये जास्त इथेनॉल ब्लेंडिंग हे टप्प्या टप्प्याने होणार आहे. यामुळं ऑटोमोबाईल कंपन्यांना यानुसार कंपॅटेबल इंजीन तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. त्याचबरोबर यासाठी लागणारी सप्लाय चेन आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभारायला देखील पुरेसा वेळ मिळेल.'

अजून एका सूत्राने सांगितलं की, 'सरकार E20 पेट्रोलबाबत गाड्यांची कम्पॅटिबिलिटी आणि मायलेज याबाबतच्या काळजीबाबत सजग आहे असं देखील सांगितलं.

सूत्रांनी सांगितलं की अचानक सर्व इकोसिस्टम विस्कळीत करण्याचा सरकारचा कोणताही उद्येश नाहीये. हे संक्रमण हळूहळू आणि इंडस्ट्रीशी त्यांच्या तयारीशी जुळवून घेत होईल.'

E25 Petrol New Rule
Ethanol Blended Petrol | इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होते; केंद्र सरकारची कबुली

इथेनॉल ब्लेंडिंग हा भारताच्या क्रुड ऑईलवरील अवलंबत्वाबाबतचा एक रणनैतिक उपक्रम आहे. यामुळं देशात उत्पादित होणाऱ्या इथेनॉलची मागणी देखील वाढणार आहे. केंद्राने आता संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर E20 पेट्रोल पोहचवलं आहे. हा उपक्रम त्याच्या २०३० च्या डेटलाईनच्या पाच वर्ष आगोदरच यशस्वी झाला आहे.

या धोरणामुळं भारताचे वर्षाला ४.५ कोटी बॅरेल क्रुड ऑईल वाचणार आहे. तसेच १.५ लाख कोटी परदेशी चलन देखील वाचणार आहे. मात्र नागरिकांमध्ये गाडीचे मायलेज आणि गाड्यांचा परफॉर्मन्सबाबत विशेष काळजीचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news