India Alliance : इंडिया आघाडीचे खासदार शुक्रवारी राष्ट्रपतींना भेटणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनाम्याच्या मागणीसह एसआयआरबाबतचे आक्षेप मांडणार
India Alliance MPs to meet President
File Photo
Published on: 
Updated on: 

India Alliance MPs to meet President

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाकडून इंडिया आघाडीच्या दहा सदस्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्यात आली आहे. या भेटीत विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनामाची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच एसआयआर प्रक्रियेबाबतचे आक्षेप देखील त्यांच्यासमोर मांडले जाणार असल्याचे समजते.

शिष्‍टमंडळात इंडिया आघाडीतील प्रमुख नेते असण्‍याची शक्‍यता

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेते राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात असण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीने यापूर्वी १५ नेत्यांच्या शिष्टमंडळासाठी राष्ट्रपतींकडे वेळ मागितला होता. मात्र, राष्ट्रपती भवनाकडून शिष्टमंडळाची संख्या दहा करण्यास सांगण्यात आले.

India Alliance MPs to meet President
IndiGo Flight Emergency Landing : १७,००० फूट उंचीवर थरार! इंडिगोच्या विमानाला विजेचा तडाखा; लखनौत इमर्जन्सी लँडिंग

निवडणूक आयोग आणि एसआयआरवर आक्षेप

मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप इंडिया आघाडीतील पक्षांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली आहे. राष्ट्रपतींसोबतच्या बैठकीत हे मुद्दे औपचारिकपणे मांडले जाणार आहेत.

India Alliance MPs to meet President
HC On Name Change : ज्योतिषशास्त्रावरील श्रद्धेपोटी मुलीचे नाव बदलण्यासाठी पालकांची न्यायालयात धाव, हायकोर्ट काय म्‍हणाले?

राष्‍ट्रपतींच्‍या भेटीसाठी पाठवले होते २ ऑक्‍टोबरला सर्वप्रथम पत्र

इंडिया आघाडीने राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी सर्वप्रथम पत्र पाठवले होते. त्यानंतर राष्ट्रपती भवनाने भेटीसाठी येणाऱ्या नेत्यांची नावे मागितली. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी पुन्हा पत्र देऊन ७, ८ किंवा ९ ऑक्टोबरपैकी कोणत्याही दिवशी भेटीसाठी वेळ मागण्यात आली होती. आता शुक्रवारी दहा सदस्यांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ निश्चित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news