India Alliance Press Conference: आता सगळं स्पष्ट झालंय.. इंडिया आघाडीचे EC विरूद्ध 'पंचास्त्र', खरगेंनी सगळा प्लॅनच सांगितला

वोट चोरी... आधी सांगत होतो त्यावेळी लक्ष दिलं नाही.... मीडियाचे नाव घेत खरगेंनी कोणावर साधला निशाणा?
India Alliance Press Conference
India Alliance Press Conferencepudhari
Published on: 
Updated on: 

India Alliance Press Conference: निवडणूक आयोगाविरूद्ध एकत्रित आवाज उठवण्याबाबत आत इंडिया आघाडीची नवी दिल्ली इथं बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडी याविरूद्ध देशभारत आंदोलन करणार असल्याचे सांगितलं.

त्यांनी यावेळी प्रामुख्याने इंडिया आघाडी ५ प्रकारे या विरूद्ध आवाज उठवणार असून सर्वोच्च न्यायालयाला देखील विनंती करणार असल्याचं सांगितलं. पत्रकार परिषदेच्या शेवटी त्यांनी आधी राहुल गांधी हे मत चोरी होत आहे हे सांगत होते. त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही आता लोकांच्या लक्षात आलं आहे असं म्हणजे माध्यमांसह इंडिया आघाडीतील अनेक पक्षांना देखील टोमणा मारला.

India Alliance Press Conference
INDIA Alliance | इंडिया आघाडीची फरफट…

पहिले अस्त्र

मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान आपण देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करणार आहेत. लोकशाही कशी धोक्यात आली आहे हे आपण तेथे जाऊन लोकांना याची जाणीवही करून देऊ की आपण हे काम कशासाठी करत आहोत.'

दुसरे अस्त्र

मल्लिकार्जुन खरगे यांनी दुसऱ्या टप्प्यात ६ ऑक्टोबरला सर्व विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत असं सांगितलं. सर्व खासदारांना बोलवून घेऊन योग्य प्रकारे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही ६ ऑक्टोबरची तारीख निवडल्याचेही त्यांनी सांगितलं.

India Alliance Press Conference
INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्‍या बैठकीत २३ पक्षांचा सहभाग, पाच मुद्द्यांवर सहमती

तिसरे अस्त्र

तिसऱ्या टप्प्यात विरोधी पक्षनेते हे राष्ट्रपतींकडे भेटीची वेळ मागतील. हे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. त्यानंतर आम्ही त्यांना आम्ही सर्वजण मिळून आम्हाला घटनात्मक कशा अडचणी येत आहेत. सरकार आमच्यासमोर घटनात्मक कशा अडचणी निर्माण करत आहे हे सांगू. हे खोटं चोरीचं सरकार सुरू आहे असं देखील त्यांना सांगू. यात आम्ही किती यशस्वी होऊ हे पाहता येईल.

चौथे अस्त्र

चौथ्या टप्प्यात आम्ही पाच मोठ्या रॅली काढणार आहोत. त्याच्या डेट्स आणि प्लॅन आम्ही सर्व मिळून ठरवू. या पाच रॅलीच्या माध्यमातून आम्ही देशातील जनतेला सरकार कशा प्रकारे तुमचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेत आहे हे पटवून सांगू. लोकशाही हा तुमचा अधिकार आहे याची देखील जाणीव त्यांना करून देऊ. या सर्व पाच रॅली ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. अशी माहिती खरगेंनी दिली.

India Alliance Press Conference
INDIA Alliance Meeting : "राहुल गांधींमध्ये कंसीस्‍टेंसीचा अभाव"; शरद पवारांच्या 'त्‍या' विधानाचे विरोधकांनी झळकावले पोस्टर!

पाचवे अस्त्र

खरगेंनी सांगितलं नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात दिल्लीत एख मोठी रॅली होणार आहे. या रॅलीत देखील आम्ही मत चोरी निवडणूक चोरीबाबत सर्वांना माहिती देणार आहोत. राहुल गांधी यांनी अनेक गोष्टी यापूर्वीच सांगितल्या आहेत. सुरूवातीला लोकांनी याकडे लक्ष दिलं नाही. आता मात्र सर्व बाहेर आलं आहे. सरकारमधील लोकांनीच हे बाहेर काढलं आहे. निवडणूक आयोगातील सदस्यांनीच हे केलं आहे. आता सर्वांना राहुल गांधी जे बोलत होते ते योग्य होतं याची जाणीव झाली आहे. असं देखील खरगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news