

In Chhattisgarh's Sukma District, Naxals killed a deputy sarpanch
सुकुमा : पुढारी ऑनलाईन
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांनी तारलागुडाचे उपसरपंच मुचाकी रामा यांची हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी या विषयी आज मंगळवारी माहिती दिली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या जगरगुंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेनपल्ली गावात सोमवारी नक्षल्यांनी तारलागुडा गावचे सरपंच मुचाकी रामा यांची हत्या केली. मुचाकी रामा यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती.
त्यांनी सांगितले की, रामा बेनपल्ली हे गावातलेच निवासी होते. तसेच ते तारलागुडा गावाचे उपसरपंच होते. पोलीसांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास शस्त्रधारी नक्षली ग्रामीण वेशभूषेत बेनपल्ली गावात आले. यावेळी नक्षल्यांनी रामा यांना घरातून बाहेर नेले. त्यांची दोरीने गळा दाबून हत्या केली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीसांना जेंव्हा या घटनेची माहिती मिळाली तेंव्हा त्यांनी पोलीस पथक बेनपल्ली गावासाठी रवाना केले. यानंतर उपसरपंचांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी बाहेर पाठवला.
त्यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. पोलिसांनी उपसरपंचांची हत्या करणाऱ्या नक्षल्यांची शोध मोहिम सुरू केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.