Surrogacy Racket : ९० हजारात घेतलेलं बाळ ३५ लाखांना विकलं, सरोगसीच्या नावाखाली करोडोंचं रॅकेट

हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमधील एका सरोगसी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय
Hyderabad Surrogacy Racket
Hyderabad Surrogacy Racket(file photo)
Published on
Updated on

Hyderabad Surrogacy Racket

हैदराबाद : येथे लागून असलेल्या सिकंदराबादमधील एका सरोगसी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हैदराबाद पोलिसांनी रेजिमेंटल बाजार येथील युनिव्हर्सल सुष्टी फर्टिलिटी सेंटरवर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांना असे आढळून आले आहे की एक बाळ एका गरीब कुटुंबातून विकत घेण्यात आले होते आणि ते २०२४ मध्ये आयव्हीएफ उपचार घेत असलेल्या एका दाम्पत्याला देण्यात आले. पण ज्यावेळी डीएनए चाचणी करण्यात आली तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सदर क्लिनिकने संबंधित दाम्पत्याने बाळासाठी सरोगसीचा पर्यायचा सल्ला दिला. त्यांना असेही सांगण्यात आले होते की हे बाळ‍ जैविकदृष्ट्या त्यांचे असेल. त्यासाठी त्यांच्याकडून ३५ लाख रुपये घेण्यात आले.

Hyderabad Surrogacy Racket
Prostitute's Den Nashik | देहविक्रीयचा अड्डा ! त्र्यंबकनाका येथे मध्यरात्री तृतीयपंथीयाचा पोलिसांसमोर राडा

या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी रविवारी आठ जणांना अटक केली. त्यात मुख्य संशयित आरोपी युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरच्या (Universal Srushti Fertility Centre) डॉ. अथलुरी नम्रता (६४), राज्य सरकारच्या गांधी रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. नारगुला सदानंदम (४१) आणि एजंट आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय?

सरोगसीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणे आणि बाळ विक्रीच्या रॅकेट प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आला आहे. सृष्टी फर्टिलिटी सेंटरचा परवाना २०२१ मध्येच रद्द केला होता. पण डॉ. नम्रता हे सेंटर बेकायदेशीरपणे चालवत असल्याचो पोलीस तपासात आढळून आले आहे. त्या हैदराबादमधील कोंडापूर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे आणखी तीन सेंटर्स चालवत होत्या. रविवारी या सर्व सेंटर्सवर छापेमारी करण्यात आली.

हे एकच नाही तर अशी अनेक प्रकरणे असू शकतात. "आम्ही फर्टिलिटी सेंटरच्या विविध शाखांमध्ये सरोगसी आणि आयव्हीएफ उपचार घेत असलेल्या इतर जोडप्यांचीही चौकशी करत आहोत, असे उत्तर विभागाच्या पोलिस उपायुक्त एस रश्मी पेरुमल यांनी सांगितले.

Hyderabad Surrogacy Racket
Woman Murder For Jwellery | पिवळ्या नारंगी धाग्याने खुलला खून; आरोपीची खळबळजनक कबुली

यापूर्वी, डॉ. नम्रथा यांची २०१६ आणि २०२० मध्ये दोनवेळा चौकशी केली होती. एका प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली होती. अमेरिकेतील एका अनिवासी भारतीय जोडप्याने आरोप केला होता की सरोगसीच्या माध्यमातून त्यांना दिलेले नवजात बाळ हे जैविकदृष्ट्या त्यांच्याशी संबंधित नाही. यानंतर तेलंगणा मेडिकल कौन्सिलने त्यांच्या फर्टिलिटी सेंटरचा परवाना पाच वर्षांसाठी निलंबित करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर २०२० मध्ये विझाग पोलिसांनी नवजात बालकांची तस्करी केल्याप्रकरणी डॉ. नम्रथा आणि इतर पाच जणांना अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी डॉक्टर आणि त्यांच्या क्लिनिक विरोधात यापूर्वीही कारवाई केली होती. त्यांच्यावर विशाखापट्टणम, हैदराबाद आणि गुंटूर या तीन ठिकाणी १० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डीएनए चाचणी केल्यानंतर खरं काय ते समोर आले?

२६ जुलै रोजी एका दाम्पत्याने गोपालपूरम पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे नवीन प्रकरण उघडकीस आले. सदर दाम्पत्याने असा आरोप केला आहे की सृष्टी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरकडून देण्यात आलेले बाळ जैविकदृष्ट्या त्यांचे नाही. यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे डीएनए चाचणीदेखील केली. त्यांच्याकडून सरोगसी प्रक्रियेसाठी ३५ लाख रुपये उकळल्याचा आरोपही दाम्पत्याने केला आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीच्या चौकशीत असेही आढळून आले आहे की हे सरोगसीचे प्रकरण नाही. डॉ. नम्रता आणि त्यांचे कर्मचारी गरीब गर्भवती महिलांना पैशाचे आमिष दाखवून नवजात बाळ खरेदी करत होते आणि ते बाळ नसलेल्या दाम्पत्यांना विकत होते, असेही एस रश्मी पेरुमल यांनी सांगितले.

बाळाच्या आईला प्रसूतीसाठी विशाखापट्टणमला पाठवले होते

त्या पुढे म्हणाल्या की, "जैविकदृष्ट्या ज्यांचे हे बाळ आहे त्यांना अटक करण्यात आली आहे. ते दाम्पत्य आसामचे आहेत. ते हैदराबादमध्ये राहत होते. त्यांच्याकडून ९० हजार रुपयांना बाळ खरेदी करण्यात आले होते. तर त्या बाळाच्या आईला प्रसूतीसाठी विशाखापट्टणमला पाठवण्यात आले होते.

सदर बाळ मुलगा आहे. ते के‍‍वळ दोन दिवसांचे असताना बाळ नसलेल्या दाम्पत्याला ते जैविकदृष्ट्या त्यांचे असल्याचे सांगून त्यांना देण्यात आले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डॉ. नम्रथा यांचा मुलगा पी. जयंत कृष्णा (२५) हा त्यांच्या आईचे आर्थिक व्यवहार पाहत होता. त्यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये क्लिनिकचे दोन कर्मचारी सी. कल्याणी अच्चयाम्मा (४०) आणि जी. छेन्ना राव (३७) आणि एजंट धनश्री संतोषी (३८) यांचाही समावेश आहे. ज्याचे जैविकदृष्ट्या हे बाळ आहे त्या पालकांचीही ओ‍‍ळख पटली आहे. मोहम्मद अली आदिक (३८) आणि नसरीन बेगम (२५) अशी त्यांची नावे आहेत. या सर्व सात संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. तर विशाखापट्टणम शाखेतील कर्मचारी सी कल्याणीला चौकशीसाठी हैदराबादला आणण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news