लव्ह मॅरेज झाले, लगेच वाद उफाळले; पत्नीचे तुकडे केले

मृतदेहाचे चार तुकडे करून लावली विल्हेवाट
Husband arrested in case of wife's murder
लग्नानंतर पत्नीचा निर्घृण खून Pudhari File Photo
Published on
Updated on

मुजफ्फरनगर : लव्ह मॅरेज केल्यानंतर सहा महिन्यांतच पती-पत्नी यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे पतीने पत्नीची हत्या केली. मृतदेहाचे चार तुकडे करून त्यांची विल्हेवाटही लावली. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर येथे सर्वांगाचा थरकाप उडविणारी ही घटना घडली.आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

त्याने निर्दयपणे पत्नीचे शिर कापले आणि त्यानंतर हात वेगळे करून मृतदेहाचे चार तुकडे केले. आरोपीचे नाव अरबाज असून दुर्दैवी पत्नीचे नाव चाहत आहे. आठवड्यापूर्वी चाहतची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. दोन व्यक्ती बाईकने काली नदीच्या दिशेने जात असल्याचा फोन पोलिसांना आला आणि पोत्यात भरलेल्या मृतदेहासह त्यांनी अरबाजच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांना पाहताच दुसरा आरोपी तिथून फरारी झाला. आमच्यात सतत भांडणे होत असल्यामुळे मी तिला संपविले, अशी कबुली अरबाजने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news