High Court: पतीचे अनैतिक संबंध म्हणजे क्रूरता नव्हे; मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Madras High Court Husband illicit relationship: पतीचे अनैतिक संबंध असणे म्हणजे कलम ४९८ 'अ' अंतर्गत केवळ 'क्रूरता' नव्हे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. वाचा सविस्तर बातमी
Madras High Court
Madras High CourtFile Photo
Published on: 
Updated on: 

Madras High Court Husband illicit relationship

चेन्नई: पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असणे, हा भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ 'अ' अंतर्गत विवाहितेला हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी त्रास देण्याचा म्हणजेच 'क्रूरतेचा' गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी शुक्रवारी एका खटल्याची सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले.

एका मृत महिलेच्या भावाने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. संबंधित महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलासह जीवन संपवले होते. पतीचे अनैतिक संबंध आणि हुंड्याच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या भावाने केला होता.

Madras High Court
High Court: कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ महिलेच्या अंगावर पडल्याचा आरोप म्हणजे बलात्कार नव्हे: उच्च न्यायालय

या प्रकरणी २३ एप्रिल २०१८ रोजी महिला न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या अभावी पतीची सर्व आरोपांमधून निर्दोष सुटका केली होती. राज्य सरकारने या निकालाविरोधात अपील न केल्यामुळे, मृत महिलेच्या भावाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, कलम ४९८ 'अ' अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी केवळ पतीचे अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध करणे पुरेसे नाही, तर त्यापलीकडे जाऊन इतर छळाचे पुरावे अभियोजन पक्षाला सादर करावे लागतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालांचा दाखला देत न्यायालयाने स्पष्ट केले की, अनैतिक संबंधांसोबतच महिलेवर झालेल्या इतर मानसिक किंवा शारीरिक क्रूरतेची पुराव्यानिशी सिद्धता होणे गरजेचे असते.

न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या 'पिनाकिन महिपातराय रावल विरुद्ध गुजरात राज्य' या खटल्याचा दाखला दिला. न्यायालयाच्या मते, अभियोजन पक्ष हुंड्याची मागणी किंवा पतीचे अनैतिक संबंध सिद्ध करू शकला नाही. तसेच, संबंधित महिलेला जीवन संपवण्यास प्रवृत्त केले, अशी कोणतीही क्रूरता घडल्याचा पुरावा आढळला नाही. पुराव्यांच्या मूल्यमापनानंतर अभियोजन पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने हे अपील फेटाळून लावले.

Madras High Court
High Court divorce case: ‘विश्वासच संपला तर लग्न टिकणार नाही’; घटस्फोटाच्या प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news