

Labor Room CCTV Video Leak: एका छोट्या क्लिनिकमधील एका कॅबिनमध्ये एका कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असतो. एक महिला त्या रूममध्ये येते तपाणी टेबलवर बसते अन् आपला गाऊन अॅडजेस्ट करून डॉक्टरला तपासणी करू देते. तिला कल्पना देखील नसते की तिच्यावरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. तिला कल्पना नसते की तिची प्रत्येक हालचाल हा कॅमेरी टिपत आहे. तिला माहिती नसतं की याची नंतर क्लिप ऑनलाईनवर व्हायरल होणार आहे. त्यावर “sexclinic.com.”, “Am8707” “Camera 13” असे वॉटरमार्क होते. ही महिला नकळत इंटरनेंटवर पॉर्नम्हणून विकल्या जाणाऱ्या रूग्णालयातील लीक फुटेजचा भाग होते.
ही एकमेव महिला नाही. अशा अनेक महिलांचे व्हिडिओ सध्या इंटरनेटवर पॉर्न म्हणून उपलब्ध आहेत. हा सगळा प्रकार कोण्या एका क्लिनिकपुरता किंवा रूग्णालयापुरता मर्यादित नाहीये किंवा एखाद्या वैद्यकीय प्रक्रियेदरम्यानचा नाहीये.
अशा शेकडो व्हिडिओ क्लिप लीक झाल्या आहेत. महिलांची लेबर रूममध्ये होत असलेली तपासणी, मॅटर्निटी वॉर्डमधील स्तनपान करतानाच्या महिला, शस्त्रक्रियेदरम्यान कपडे बदलतानाच्या महिला, आयसीयूमध्ये बेशुद्ध अवस्थेत बेडवर झोपलेल्या महिला किंवा मुलांना जन्म देतानाच्या महिला असे शेकडो व्हिडिओ सध्या इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहेत. यातील अनेक कॅमेरे हे नियमीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे सीसीटीव्ही लावले आहेत याची कल्पना रूग्णांना दिलेली नसते.
हा सगळा प्रकार असुरक्षित सीसीटीव्ही नेटवर्क, डिजीटल हायजीनच्या बाबतीतला कमजोरपणा, नियमांची वणवा यामुळं हॅकर्सना रूग्णांच्या रूग्णलयातील हे व्हिडिओ गोळा करून त्यावर बक्कळ पैसा कमवण्याची संधी मिळाली आहे. अनेक क्लिनिक आणि छोट्या रूग्णालयात कॅमेरा सिस्टम या खुल्या ठेवल्या जातात किंवा त्या एखाद्या डिफॉल्ट पासवर्डद्वारे सुरक्षित केल्या जातात. यामुळे ज्यांना याचे साधारण तांत्रिक ज्ञान असलं तरी ते हे क्रॅक करू शकतात.
गेल्या अनेक महिन्यांपासून 'द न्यूज मिनिट' ही वृत्तसंस्था याची गुप्तपणे शोधपत्रकारिता करत होती. त्यांनी रूग्णालयाचे फुटेज ऑनलाईन कसे येतात याचा शोध घेण्यासाठी त्यांनी ज्या टेलिग्राम चॅनलवर या क्लिप विकल्या जात आहेत ते चॅनल जॉईन केलं. इथं प्रवेश मिळवणं धक्कादायकरित्या अत्यंत सोपा होता. त्यांनी काही मिनिटातच एक चॅनल जॉईन केला. ग्रुपच्या अॅडमीननं त्यांना विक्रीसाठी ठेवलेल्या क्लिपचा कॅटलॉगच समोर ठेवला. यात थिएटरमधील क्लिप, हॉस्टेल, घर आणि रूग्णालयातील क्लिप होत्या. यातील एका फोल्डरसाठी युपीआयद्वारे १५०० रूपये पेमेंट करायचं होतं. या फोल्डरमध्ये हजारो सीसीटीव्ही क्लिप उपलब्ध होत्या.
यातील हॉस्पिटलचे फुटेज हे त्यांच्या इंटिमेट आणि संवेदनशील नेचरमुळे लक्षवेधी ठरतात. यात मुल जन्माला येतानाचे हाय माऊंटेड कॅमेरा फुटेज, इंजेक्शन रूप प्रोसिजर, एक्स-रे सेशन आणि सामान्य वॉर्डमधील सर्व अॅक्टिव्हिटी सीसीटीव्हीद्वारे टिपल्या जातात. जरी या क्लिपला आवाज नसला तरी रेकॉर्डिंग प्रभावी ठरतात. हे सर्व फुटेज फार काळजीपूर्वक ऑर्गनाईज केलं आहे. हे फुटेज सहसा कॅमेरा नंबरद्वारे टॅग केलेले असतात.