ब्रेकिंग: मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच, काेठडीत ३१ मेपर्यंत वाढ

( मनीष सिसोदिया संग्रहित छायाचित्र )
( मनीष सिसोदिया संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आज (दि.२१) माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ केली आहे. वास्तविक, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती, त्यामुळे त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 31 मे पर्यंत वाढवली.

दिल्‍ली मद्य धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी  सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी सिसोदिया यांनाअटक केली होती. तेव्‍हापासून ते कोठडीत आहेत. तिहार तुरुंगात चौकशी केल्यानंतर 'ईडी' ने ९ मार्च २०२३ रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांना अटक केली हाेती. सिसोदिया यांनी २८ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. दिल्ली सरकारने १७ नोव्हेंबर 2021 रोजी मद्य धोरण लागू केले होते; परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सप्टेंबर 2022 च्या अखेर ते रद्द करण्‍यात आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news