Hemant Soren ED Case: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दिलासा, ईडीच्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

ईडीने "मोठ्या प्रमाणात" तक्रारी दाखल केल्याचा उल्लेख न्यायालयाने केला.
Hemant Soren
Hemant SorenPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली:  झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील खटल्याला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सोरेन यांनी खटला रद्द करण्याची मागणी केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली.

Hemant Soren
CM Hemant Soren | सोरेन यांना दिलासा कायम ! अटकेविरूद्ध ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

जमीन अधिग्रहण प्रकरणासंदर्भात ईडीने दाखल केलेल्या तक्रारीवरून हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरु करण्यात आली होती. ईडीने तक्रारीत जमीन अधिग्रहण प्रकरणासंदर्भात समन्स बजावल्यानंतरही हजर न राहिल्याचा आरोप केला होता.

Hemant Soren
Hemant Soren: झारखंड जमीन घोटाळा प्रकरण: हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, जामीनावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली

सर्वोच्च न्यायालयासमोरील याचिकेत, सोरेन यांनी ईडीने त्यांना बजावलेल्या वारंवार समन्सलाही आव्हान दिले होते. ईडीने "मोठ्या प्रमाणात" तक्रारी दाखल केल्याचा उल्लेख न्यायालयाने केला. आम्ही वर्तमानपत्रात वाचले आहे की तुम्ही (ईडीने) मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या आहेत. लक्ष केंद्रित करा आणि त्या तक्रारींवर तुमची ऊर्जा खर्च करा. तुमचे काही रचनात्मक निकाल लागतील, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ईडीच्या वकिलाला म्हटले.

Hemant Soren
Hemant Soren : बेकायदेशीर खाण प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

न्यायमूर्ती बागची म्हणाले की, ईडी प्रभावी खटल्यांऐवजी भीती निर्माण करणारे खटले चालवत आहे. फक्त तक्रारी दाखल करून उद्देश साध्य होत असल्याचे दिसून आले आहे, असे ते म्हणाले.

Hemant Soren
Jharkhand CM Hemant Soren | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सुप्रीम कोर्टात धाव, काय आहे प्रकरण?

रांची येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित असलेली फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी सोरेन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली. मुख्यमंत्र्यांनी समन्सचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ईडीने दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीच्या आधारे दंडाधिकाऱ्यांसमोर ही कारवाई सुरू झाली होती. झारखंड उच्च न्यायालयाने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांची कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news