Himachal monsoon disaster | हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 63 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक बेपत्ता, 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

Himachal monsoon disaster | आत्तापर्यंत सुमारे 400 कोटींचे नुकसान; 14 पूल वाहून गेले, 500 हून अधिक रस्ते बंद
Himachal monsoon disaster
Himachal monsoon disasterPTI
Published on
Updated on

Himachal monsoon disaster floods 2025 Cloudburst landslide death toll rising

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि अचानक आलेल्या पूरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

या नैसर्गिक आपत्तींमुळे आतापर्यंत किमान 63 जणांचा मृत्यू झाला असून, 40 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

राज्यात 7 जुलैपर्यंत सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सर्वात जास्त नुकसान मंडी जिल्ह्यात झाले असून, येथील थुनाग, बगस्याड, करसोग आणि धरमपूर या भागांत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

400 कोटींचे नुकसान...

हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विशेष सचिव डी. सी. राणा यांनी सांगितले की, “आत्तापर्यंत सुमारे 400 कोटी रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. प्रत्यक्ष नुकसान यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. सध्या आमचा प्राथमिक भर बचाव, शोध आणि पुनर्संचयना यावर आहे.”

Himachal monsoon disaster
BJP Woman President | भाजपमध्ये महिला अध्यक्ष होण्याची शक्यता; निर्मला सीतारामन, डी. पुरंदेश्वरी, वनाथी श्रीनिवासन यांची नावे आघाडीवर

राज्यातील मृत्यू आणि हानीची माहिती

  • मंडी: 17 मृत्यू

  • काँग्रा: 13 मृत्यू

  • चंबा: 6 मृत्यू

  • शिमला: 5 मृत्यू

या व्यतिरिक्त बिलासपूर, हमीरपूर, किन्नौर, कुल्लू, लाहौल-स्पीती, सिरमौर, सोलन आणि ऊना जिल्ह्यांतूनही मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यभरात प्रचंड हानी

  • 100 हून अधिक जखमी

  • शेकडो घरे उद्ध्वस्त

  • 14 पूल वाहून गेले

  • 300 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू

  • 500 हून अधिक रस्ते बंद

  • 500 पेक्षा अधिक वीज ट्रान्सफॉर्मर्स बंद, अनेक भाग अंधारात

  • पिण्याच्या पाण्याचा आणि अन्नाचा तुटवडा

सरकारकडून मदतीचे आश्वासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचलसह गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून NDRF पथकांची तैनाती केली असून, आवश्यकतेनुसार अधिक पथके पाठवली जातील, असे आश्वासन दिले आहे. “केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Himachal monsoon disaster
Lalit Modi Vijay Mallya London party | ललित मोदी-विजय मल्ल्यांचा लंडनमधील पार्टीत नाचत-गात जल्लोष; पाहा व्हिडीओ, नेटीझन्स संतप्त

सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये, नद्या चिखलमय समुद्रासारख्या दिसत आहेत ज्या संपूर्ण घरांना वाहून नेत आहेत.

मंडी आणि सिरमौर जिल्ह्यातील व्हिडिओंमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी ओरडताना दिसतात. शिमल्याच्या ढल्ली भागात झालेल्या भूस्खलनाचा व्हिडिओ दूरदर्शनने शेअर केला आहे.

राज्य सरकार, NDRF आणि स्थानिक प्रशासनांकडून शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून, हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news