अनिल देशमुखांविरोधातील याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अनिल देशमुख
अनिल देशमुख

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवार,२० जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. याचिकेतून देशमुखांच्या बाजूने उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आदेश रद्द करण्याची मागणी सीबीआयने केली आहे.

सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी.एस.नरसिम्हा यांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. देशमुख यांची जामीनावर सुटका झाली आहे. यानंतर  १७ डिसेंबर २०२२ रोजी सीबीआयने देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

१२ डिसेंबरला उच्च न्यायालयाने देशमुख यांना १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. यासोबतच न्यायालयाने सीबीआयला जामीन आदेशाविरोधात अपील करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिला होता. नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुख यांची जामीन याचिका फेटाळली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news