Panchkula School Horror: धक्कादायक! ८ वर्षाच्या मुलानं ६ वर्षाच्या मुलीच्या डोक्यात दगड अन् फ्लॉवरपॉट घातला; बेशुद्ध पडल्यावर..

haryana panchkula school incident: इथं पडलीये तुमची मुलगी... पालक मुलीला घेऊन जायला आल्यावर आरोपी मुलागाच वर्गात घेऊन गेला
Panchkula School Horror
Panchkula School Horrorpudhari
Published on: 
Updated on: 

Panchkula School Incident: हरियाणाच्या पंचकुलामधील एका शाळेतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने त्याच शाळेतील केजीच्या वर्गातील ६ वर्षाच्या चिमुकलीला डोक्यात दगड अन् फ्लॉवरपॉट घालून मारहाण केली. याबाबतचे सीटीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. मुलगी गंभीररित्या जखमी असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपी मुलाच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

Panchkula School Horror
Pasighat Violence : अरुणाचलमध्ये केंद्राकडून २५० RAF जवान तैनात : सियांग खोऱ्यात हिंसक निदर्शने का झाली?

पंचकुला येथील प्रतिष्ठित शाळेतील घटना

पंचकुला येथील संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. याबाबतचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात आठ वर्षाचा मुलगा केजीमध्ये शिकणाऱ्या मुलीला वर्गात घसटत घेऊन येते. त्यानंतर तिचे डोके डेस्कवर दोनवेळा आपटतो. तिला जमिनीवर टाकून तिला लाथा मारतो. त्यानंतर दगडाने आणि फ्लॉवर पॉटने त्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर सतत हल्ला करतो. या मारहाणीत मुलगी बेशुद्ध होते. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून येते.

मात्र तो मुलगा त्यानंतरही थांबत नाही. तो त्या पीडित मुलीला घसटत नेते आणि लाथा मारण्याचा प्रयत्न करतो. अखेर दीड मिनिटाने तो मुलगा क्लासरूममधून बाहेर जातो.

Panchkula School Horror
Jantar Mantar Violence : जंतर मंतर हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाची समिती करणार!

आरोपी मुलगाच पालकांना घेऊन गेला

ज्यावेळी त्या मुलीचे पालक तिला शाळेतून घेण्यासाठी येतात त्यावेळी आरोपी मुलगा त्यांना त्या मुलीपर्यंत घेऊन जातो. तो मुलगा म्हणतो की तुमची मुलगी इथं पडली आहे.

यानंतर पालक त्या मुलीला घेऊन जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेतात. तिथं तिच्यावर प्राथमिक उचपार केले जातात. मात्र तिला गंभीर इजा झाल्याने तिला चंदीगडमधील पीजीआय रूग्णालयात दाखल केलं जातं. या पीडित चिमुकलीची प्रकृती सध्या गंभीर आहे.

Panchkula School Horror
HC on Domestic Violence :मुलावर नियंत्रण ठेवले नाही म्हणून 'कौटुंबिक हिंसाचारात' सासऱ्याला जबाबदार धरता येणार नाही : हायकोर्ट

पालकांची चौकशी सुरू

दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी मुलाच्या पालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. कोणत्या परिस्थिती एवढ्या लहान मुलानं एवढी हिंसक कृती केली याचा शोध घेतला जात आहे.

पीडित मुलीच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे आरोपी मुलाने ज्यावेळी पीडित मुलीने त्याची शाळेच्या टीचर्सकडे तक्रार करणार असं सांगितल्यावर तिच्यावर हा हिंसक हल्ला केला.

काका म्हणाले, 'या मुलाने यापूर्वी देखील आक्रमक स्वभाव दाखवला आहे. त्याच्याविरूद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याने श्वांनांना देखील मारहाण केल्याची तक्रार त्याच्याविरूद्ध झाली आहे.' या घटनेनंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षितेतेबाबत देखील गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.