Pasighat Violence : अरुणाचलमध्ये केंद्राकडून २५० RAF जवान तैनात : सियांग खोऱ्यात हिंसक निदर्शने का झाली?

Arunachal Pradesh Siang Hydroelectric Project Protest: अरुणाचलमध्‍ये जलविद्युत प्रकल्पावरुन उडाला हिंसाचाराचा भडका
Pasighat Violence
प्रतिकात्‍मक छायाचित्र. File Photo
Published on: 
Updated on: 

Arunachal Pradesh Siang Hydroelectric Project Protest: प्रस्तावित ११,२०० मेगावॅटच्या सियांग अप्पर बहुउद्देशीयप्रकल्पाविरोधात पासीघाट येथे झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर केंद्राने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (RAF) दोन कंपन्या अरुणाचल प्रदेशात पाठवल्या आहेत, अशी माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्‍यान, पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट सियांग प्रकल्पाविरोधातील निदर्शनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एनएचपीसी कार्यालय व पोलीस ठाण्याला आग लावली आणि दोन आमदारांसह भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड व लूटमार केली. सलग नऊ तास चाललेल्या या हिंसाचारात दगडफेकीत ४० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

चीनच्या महाकाय धरणाला प्रत्युत्तर म्हणून अरुणाचलमध्‍ये जलविद्युत प्रकल्प

अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात तीन जिल्ह्यांत पसरलेला, भारताचा प्रस्तावित सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, चीनद्वारे तिबेटमध्ये बांधल्या जाणाऱ्या महाकाय धरणाला एक धोरणात्मक प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक आदिवासी समुदायांकडून तीव्र विरोध होत आहे.

Pasighat Violence
Donald Trump : फ्रान्‍समध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब का उसळला? अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली धक्कादायक कारणे

अरुणाचलमध्ये केंद्राकडून २५० RAF जवान तैनात

केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या निर्देशानुसार, सुमारे २५० जवानांचा समावेश असलेल्या या दोन कंपन्यांना भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानाने नवी मुंबईतून तातडीने एअरलिफ्ट करण्यात आले. रविवारी सकाळपर्यंत या तुकड्या पासीघाट येथे पोहोचून तैनात झाल्या आहेत, असे पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आरएएफ ही सीआरपीएफची दंगलविरोधी विशेष तुकडी असून तिचे जवान निळ्या रंगाच्या गणवेशात असतात. हिंसाचारग्रस्त भागात सीआरपीएफच्या आधीच काही तुकड्या तैनात आहेत, तसेच अरुणाचलमध्ये सीआरपीएफच्या दोन ते तीन बटालियन्सचा कायमस्वरूपी बंदोबस्तही आहे.

शुक्रवारी रात्री कसा भडकला हिंसाचार?

पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट येथे ११,२०० मेगावॅटच्या सियांग प्रकल्पाविरोधातील निदर्शने शुक्रवारी रात्री हिंसक वळण घेतली. 'Gen Z' आंदोलकांनी एनएचपीसी कार्यालय व पोलीस ठाण्याला आग लावली आणि दोन आमदारांसह भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड व लूटमार केल्याचे पोलिसांनी सांगितले. सलग नऊ तास चाललेल्या या हिंसाचारात दगडफेकीत ४० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच अश्रुधुराचा नळकांड्या लागल्याने एक आंदोलक जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हिंसेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पासीघाट, मेबो आणि रुक्सिन भागात सार्वजनिक सभा व मिरवणुकांवर बंदी घातली आहे.

Pasighat Violence
Tibet Earthquake : तिबेटमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 7.0 तीव्रतेची नोंद

प्रकल्पावरून नेमका वाद काय?

भारताचा हा ११,२०० मेगावॅट क्षमतेचा सियांग प्रकल्प अरुणाचलमधील तीन जिल्ह्यांत नियोजित असून, चीनच्या सीमेवरील मेगा डॅम प्रकल्पाला सामरिक प्रत्युत्तर म्हणून पाहिला जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे गावे पाण्याखाली जातील आणि नदीशी असलेले त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे नाते तुटेल, या भीतीपोटी तेथील स्थानिक आदिवासी बांधवांकडून या योजनेला तीव्र विरोध होत आहे. तिबेटमध्ये 'यार्लुंग त्संगपो' नावाने ओळखली जाणारी ही नदी गेमिंगजवळ अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि सदिया येथे दिबांग व लोहित नद्यांना मिळते. पुढे ही नदी 'ब्रह्मपुत्रा' म्हणून ओळखली जाते.

Pasighat Violence
India Israel relations : नेतान्याहूंकडून PM मोदींना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनासाठी आमंत्रण, कॅप्टन मच्छार उपस्थित राहणार

'प्री-फिजिबिलिटी सर्व्हे' म्हणजे काय?

मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी स्पष्ट केले की, 'प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट' म्हणजे केवळ प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता आणि संभाव्य परिणामांचे प्राथमिक मूल्यांकन असते; प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याची ती परवानगी नसते.हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या योग्य आढळल्यास 'सोशल इम्पॅक्ट असेसमेंट' (SIA), पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (EIA) आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) यांसारख्या अनेक कडक टप्प्यांतून जावे लागेल. अनेक गावांनी सर्व्हेच्या कामासाठी सरकारसोबत करारही केले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, व्यापक आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीसह जनतेच्या भावनांचा आदर करूनच पूर्ण केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news