Crime News : लग्न मोडल्याने नराधमाचे भयंकर कृत्य; मध्यरात्री घरात घुसून दोन बहिणींवर ॲसिड हल्ला

व्‍यसनामुळे तरुणीच्‍या नातेवाईकांनी दिला होता लग्‍नास नकार
crime News
crime Newspudhari photo
Published on
Updated on

Crime News : लग्न मोडल्याने एका नराधमाने दोन बहिणींवर मध्यरात्री ॲसिड फेकून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोन्ही बहिणी गंभीर भाजल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशमधील हापूरमधील सिमभावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

तरुण ड्रग्‍जच्‍या आहारी, ठरलेले लग्‍न मोडले

मिळालेल्या माहितीनुसार, आवास विकास कॉलनीतील रहिवासी आरोपी हर्ष भाटी याचा विवाह पीडित तरुणीशी ठरला होता. मात्र, आरोपी हर्ष हा अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) आहारी गेल्याचे समजताच मुलीच्या कुटुंबाने हा विवाहसंबंध तोडण्याचा निर्णय घेतला.

crime News
Supreme Court : स्टॅम्प ड्युटी 'मास्टर प्लॅन'नुसार नाही, जमिनीच्या प्रत्‍यक्ष वापराच्या स्वरूपावर आधारित असावी : सुप्रीम कोर्ट

मध्यरात्री भिंत ओलांडून घरात प्रवेश

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही बहिणी घरात गाढ झोपल्या असताना आरोपीने भिंत ओलांडून गुपचूप घरात प्रवेश केला. त्याने झोपलेल्या दोन्ही बहिणींवर ॲसिड ओतले आणि तिथून पळ काढला. ॲसिड पडताच दोन्ही बहिणींच्या अंगाची लाहीलाही झाली आणि त्यांनी आकांत केला. आरडाओरडा ऐकून घरातील इतर सदस्य जागे झाले. दोन्ही बहिणी गंभीररीत्या भाजल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे.

crime News
Thane Crime News: खुनाच्या गुन्ह्यातील अट्टल गुंडास राजस्थानातून अटक

पोलीस कोठडीत आरोपीची सखोल चौकशी

घटनेची माहिती मिळताच सिमभावली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी हर्ष भाटीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्‍थानिक पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी हर्ष भाटी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीने घरात प्रवेश कसा केला आणि हल्ल्यासाठी वापरलेले ॲसिड त्याने कुठून आणले, या सर्व बाबींचा पोलीस कसून तपास करत आहेत. सध्या दोन्ही बहिणींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news