Working Mother: माझी आई नोकरीही करते, घरही सांभाळते; 15 वर्षांच्या मुलीनं लिहिलं कंपनीच्या HRला भावनिक पत्र

Working Mother Story: 15 वर्षांच्या स्तुती नावाच्या मुलीने तिच्या आईच्या कामाबद्दल आणि कंपनीतील वर्क कल्चरबद्दल हाताने लिहिलेलं पत्र HR अधिकाऱ्याला पाठवलं आहे. या पत्रातून काम करणाऱ्या आईचा संघर्ष आणि प्रामाणिकपणा दिसतो.
Handwritten Letter Working Mother Godrej HR
Handwritten Letter Working Mother Godrej HRPudhari
Published on
Updated on

Handwritten Letter Working Mother Godrej HR: कंपनीत काम करताना अनेकदा ई-मेल येतात, पुरस्कार मिळतात, कौतुक होतं. पण कधी कधी एखादं साधं, मनापासून लिहिलेलं पत्र सगळ्यांपेक्षा जास्त भावतं. अशीच एक घटना समोर आली आहे. मेघा गोयल, या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीत HR आहेत. त्यांना एका कर्मचाऱ्याच्या 15 वर्षांच्या मुलीकडून हाताने लिहिलेलं पत्र मिळालं आहे. हे पत्र एका मुलीने तिच्या आईबद्दल लिहिलेलं आहे.

आईला काम करताना पाहणारी मुलगी

स्तुती नावाच्या या मुलीची आई सोनाली नाहर गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये काम करते. स्तुती सांगते की ती एकत्र कुटुंबात वाढली आहे. घर, जबाबदाऱ्या, परंपरा सगळं सांभाळून तिची आई नोकरी करते. स्तुतीनं पत्रात लिहिलं की, “मी माझ्या आईला अनेकदा थकलेली पाहिलं आहे, पण कधीच हार मानताना पाहिलं नाही.”

Handwritten Letter Working Mother Godrej HR
Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांना मोठा झटका; 1 फेब्रुवारीपासून होणार महाग, कोणत्या शेअर्सवर होणार परिणाम?

स्तुती म्हणते की तिचे मित्र जेव्हा विचारतात, “तुझी आई कुठे काम करते?” तेव्हा ती अभिमानाने सांगते, “माझी आई गोदरेज प्रॉपर्टीमध्ये काम करते. ही खूप चांगली कंपनी आहे.” ती म्हणते, तिच्या आईला फक्त कामासाठी नाही, तर एक व्यक्ती म्हणून खूप आदर आणि सन्मान मिळतो. त्यामुळे तिला सुरक्षित वाटतं.

HR अधिकाऱ्याची भावनिक पोस्ट

हे पत्र वाचल्यानंतर मेघा गोयल यांनी म्हटलं की, “हे पत्र माझ्यासाठी खूप खास आहे. एका मुलीच्या नजरेतून तिच्या आईचं काम दिसणं, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं समाधान आहे.” त्यांनी सांगितलं की, अशा पत्रांमुळेच काम करण्याची प्रेरणा मिळते.

Handwritten Letter Working Mother Godrej HR
Gig Workers Strike: गिग वर्कर्सच्या संपावर झोमॅटोचे CEO दीपिंदर गोयल यांची पोस्ट चर्चेत; सोशल मीडियावर मोठा वाद

स्तुतीने आपल्या पत्रात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ती म्हणते, “जेव्हा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना समजून घेते, तेव्हा तिथे काम करणारा कर्मचारी फक्त कर्मचारी राहत नाही, तर तिथे कुटुंबं तयार होतं”

15 वर्षांच्या मुलीचं हे पत्र आज अनेकांना विचार करायला लावणारं आहे. आईचं काम, तिची मेहनत आणि कंपनीचं वर्क कल्चर, हे सगळं मुलीच्या पत्रातून समोर आलं आहे. त्यामुळे कंपनी कशी असली पाहिजे, याचं उत्तम उदाहरण या मुलीचं पत्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news