"तुम्ही केंद्रीय मंत्री होऊ शकता.." : केरळच्या माजी मुख्य सचिवांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर केला धक्कादायक आरोप

Gyanesh Kumar BJP controversy : २०१६ मध्ये थेट भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा दिला होता सल्ला
Gyanesh Kumar BJP controversy
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, केरळचे माजी मुख्य सचिव जिजी थॉमसन. Pudhari
Published on: 
Updated on: 
Summary

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर केरळचे माजी माजी मुख्य सचिव जिजी थॉमसन यांनी धक्‍कादायक आरोप केला आहे.

Gyanesh Kumar BJP controversy : सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भाजपमध्ये सहभागी होण्याचा आणि पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी २०१६ मध्ये दिला होता, असा धक्कादायक आरोप केरळचे माजी मुख्य सचिव जिजी थॉमसन यांनी केला आहे.

२०१६ मध्ये विमान प्रवासावेळी सल्ला

एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना थॉमसन यांनी सांगितले की, २०१६ मध्ये ज्ञानेश कुमारांबरोबर नवी दिल्लीला जाणारा विमानप्रवास करत होतो. तेव्हा दोघेही सरकारी सेवेत कार्यरत होते. यावेळी कुमार यांनी त्यांना सांगितले होते की, लोकसभा निवडणुकीत निवडून आले तर केंद्रीय मंत्री होऊ शकतात.

Gyanesh Kumar BJP controversy
CEC Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची निवडणूक आयुक्तांसोबत बैठक; 'SIR' बाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

प्रस्ताव फेटाळून लावला

मी हा प्रस्ताव फेटाळून लावला. आपल्याला निवडणूक राजकारणात येण्यामध्ये स्वारस्य नाही. स्वतः एक वरिष्ठ सरकारी अधिकारी असताना कुमार यांच्याकडून असा सल्ला आला, याचे त्यांना विशेष आश्चर्य वाटले, असेही थॉमसन यांनी स्पष्ट केले.

Gyanesh Kumar BJP controversy
CEC Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात राज-उद्धव एकत्र! ४ ऑक्टोबरला मुंबईत ठाकरे बंधूंचा महामोर्चा, काय आहे प्लॅन?

थॉमसन यांचा खुलासा का महत्त्वपूर्ण?

१९८० च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस (IAS) अधिकारी असणाऱ्या थॉमसन यांनी निवृत्तीपूर्वी जानेवारी २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या काळात मुख्य सचिव म्हणून काम पाहिले. त्यांनी राज्य आणि केंद्र स्तरावर अनेक वरिष्ठ पदेही भूषवली होती. यामध्ये 'स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया'चे महासंचालक आणि 'केरळ स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'चे व्यवस्थापकीय संचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे. अशी प्रदीर्घ सरकारी सेवेतील कारकीर्द पाहता एकीकडे विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप करत असताना थॉमसन यांचा खुलासा महत्त्वपूर्ण ठरतो. दरम्‍यान, थॉमसन यांना यापूर्वीही राजकीय नेत्यांनी निवडणूक राजकारणात येण्यासाठी विचारणा केली होती. २०२१ मध्ये, काँग्रेस नेत्यांनी त्यांना वट्टियूरकावू मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता.

Gyanesh Kumar BJP controversy
Gyanesh Kumar Controversy: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून NDA मध्ये नाराजी; भाजपच्या मित्रपक्षांनीच केली मोठी मागणी

लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा आरोप काय होता?

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, निवडणुकांवर देखरेख करणाऱ्या अधिकारीपदी नियुक्ती होण्यापूर्वी कुमार भाजपसाठी लोकांना भरती करण्याच्या कामात गुंतलेले होते. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, "ज्ञानेश कुमार त्यावेळी कार्यरत आयएएस अधिकारी होते आणि त्यांचा वापर भाजपसाठी भरती करण्यासाठी केला गेला होता."

Gyanesh Kumar BJP controversy
CEC Gyanesh Kumar: 'महाभियोग आणता येणार नाही', ज्ञानेश कुमार प्रकरणात अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी असं का म्हणाले?

विरोधी पक्षांकडून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, अन्य दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी आयोगाच्या निर्णयांबाबत वारंवार अधिकृत आक्षेप नोंदवले होते. हे आक्षेप 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेच्या विविध पैलूंशी संबंधित होते; यामध्ये 'फॉर्म ६' मधील बदल, मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची किंवा वगळण्याची प्रक्रिया आणि मतदार डेटाबेसवरील केंद्रीकृत नियंत्रण या बाबींचा समावेश होता. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर विरोधी पक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत आणि देशाच्या विविध भागांत निदर्शने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news