पतीमध्ये शुक्राणूंची संख्या कमी, म्हणून गर्भधारणेसाठी सासऱ्यानेच केला सुनेवर बलात्कार

Gujarat woman rape case : वडोदरा येथे पतीमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याने मूल होण्यासाठी सासऱ्याने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Gujarat woman rape case
Gujarat woman rape casefile photo
Published on
Updated on

Gujarat woman rape case

वडोदरा : पतीमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याने मूल होऊ शकत नाही, म्हणून चक्क सासऱ्याने आणि नणंदेच्या पतीनेच सुनेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना गुजरातच्या वडोदरा शहरात उघडकीस आली आहे. या अत्याचारातून पीडित महिला गर्भवती राहिली, मात्र दुर्दैवाने तिचा गर्भपात झाला. यानंतर पीडितेने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सासरा आणि नातेवाईकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पती नपुंसक, म्हणून सासरच्यांनीच रचला अत्याचाराचा कट

पीडित महिला ४० वर्षाची आहे. तिने नवापुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये तिचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही आठवड्यांनंतर सासरच्यांनी तिला सांगितले की ती तिच्या वयामुळे गर्भवती राहू शकत नाही आणि तिला उपचार घेण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय तपासणीत पीडितेच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या (sperm count) खूपच कमी असल्याने ते वडील होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले.

वैद्यकीय सल्ल्यानुसार तिने इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) केले, परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर तिने पुढील उपचार घेण्यास नकार दिला आणि मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला, परंतु तिच्या सासरच्यांनी याला ठाम नकार दिला.

Gujarat woman rape case
Mumbai Crime: ३ महिन्यात २०० नराधमांनी केला अत्याचार, मुंबईतून झाली सुटका; १२ वर्षांच्या बांगलादेशी मुलीच्या पदरी नरकयातना

सासऱ्याचा अत्याचार आणि पतीचाच पाठिंबा

जुलै २०२४ मध्ये पीडिता तिच्या खोलीत झोपली असताना, सासऱ्याने तिच्या खोलीत प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. तिने मदतीसाठी आरडाओरड केली असता, सासऱ्याने तिला मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार तिने पतीला सांगितला असता, त्याने तिलाच गप्प राहण्यास सांगितले. "मला मूल हवं आहे, त्यामुळे जे घडलं त्याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही," इतकेच नाही, तर "जर तू याबद्दल कोणाला सांगितले, तर तुझे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन," अशी धमकी देत पतीने तिला ब्लॅकमेल केले. यानंतरही सासऱ्याने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला, पण ती गर्भवती राहिली नाही. डिसेंबर २०२४ मध्ये तिच्या नणंदेच्या पतीनेही तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर त्यानेही अनेकदा हे अमानुष कृत्य केले.

गर्भपातानंतर प्रकरण उघडकीस

या अत्याचाराच्या मालिकेनंतर अखेर जून महिन्यात पीडित महिला गर्भवती राहिली. मात्र, जुलै महिन्यात तिचा गर्भपात झाला. या घटनेने खचलेल्या पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून रविवारी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडितेच्या सासऱ्यावर आणि नणंदेच्या पतीवर बलात्कार व लैंगिक छळाचा, तर पतीवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news