Crime News: लज्जास्पद! नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर सलग तीन दिवस लैंगिक अत्याचार; गर्भनिरोधक गोळ्या दिल्या अन्...

एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर सलग तीन दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Gujarat crime news

नवसारी: बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात घडली आहे. एका नराधम बापाने आपल्याच १४ वर्षांच्या मुलीवर सलग तीन दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवसारी जिल्ह्यात राहणाऱ्या या नराधमाने ९, १० आणि ११ मे रोजी सलग तीन दिवस अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर अत्याचार केल्यानंतर त्याने पीडित मुलीला गर्भनिरोधक गोळ्या देखील दिल्या. "याबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवंत मारून टाकेन," अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. ज्यामुळे ती प्रचंड घाबरली होती आणि तिने कोणाकडेही वाच्यता केली नाही.

Crime News
Crime News: वेब सीरिज पाहून प्लॅन, पाच महिने तयारी आणि जळालेली कार; अल्पवयीन मुलाने कुटुंबातील चौघांची हत्या कशी केली?

हा भयानक प्रकार सहन करत असलेल्या पीडितेने अखेर ३० मे रोजी धीर एकवटून आपल्या आईला या अत्याचाराची आपबिती सांगितली. पोटच्या मुलीवर ओढवलेला हा प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तात्काळ पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली. "माझ्या पतीला त्याच्या या कृत्याबद्दल फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे," अशी संतप्त मागणी पीडितेच्या आईने आपल्या तक्रारीत केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी बापाविरुद्ध भारतीय दंड संहितेसह 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपीने गावातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून काही तासांतच त्याला बेड्या ठोकल्या. सध्या न्यायालयाने त्याची रवानगी तरूंगात केली आहे.

Crime News
Dombivali Crime: अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; एमएफसी पोलिसांनी ठोकल्या कराटे प्रशिक्षकाला बेड्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news