Dombivali Crime: अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; एमएफसी पोलिसांनी ठोकल्या कराटे प्रशिक्षकाला बेड्या

या घटनेमुळे ज्या भागात ही घटना घडली त्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Dombivali Crime
Dombivali CrimePudhari
Published on
Updated on

डोंबिवली: कल्याणमध्ये गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार उघडकीस आला असून प्रशिक्षणार्थी नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा दोनदा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली महात्मा फुले चौक पोलिसांनी कराटे प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेमुळे ज्या भागात ही घटना घडली त्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. यातील पिडीत मुलीने दिलेल्या माहितीनुसार तिच्याशी यापूर्वीही निंदनीय कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश पंढरीनाथ वाघमारे (47) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Dombivali Crime
Vasai Virar tax hike: वसई-विरार मनपाचा लाभकराच्या माध्यमातून करवाढीचा प्रयत्न; भाजप आक्रमक

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आरोपी गिरीश वाघमारे याच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून कराटेचे प्रशिक्षण घेत होती. दोन दिवसांपूर्वी इतर मुली प्रॅक्टिससाठी आल्याचे सांगून आरोपी वाघमारे याने पिडीत मुलीला घरी बोलावले.

मुलगी घरात गेल्यावर आरोपी वाघमारे याने तिच्यासोबत अश्लील कृत्य सुरू केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलगी भयभीत झाली. तिने तेथून पळ काढून स्वतःचे घर गाठले. आपल्यावर बेतलेल्या प्रकाराची माहिती तिने सांगितल्यावर आई-वडिलांनी आरोपी वाघमारे याच्या घरी जाऊन संताप व्यक्त केला.

आपण काहीही केले नसल्याचा कांगावा करत वाघमारे याने आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या पिडीत मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती कथन केल्यानंतर मात्र वाघमारेची बोबडीच वळली.

यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गिरीश वाघमारे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

Dombivali Crime
Vasai Virar power demand: वसई-विरारमध्ये विजेच्या मागणीत मोठी वाढ; उष्णतेमुळे वीज वापर विक्रमी पातळीवर

पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कराटे प्रशिक्षक गिरीश वाघमारे याला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आणखीही प्रशिक्षणार्थींसोबत दुष्कृत्याचा संशय

घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नगरसेवक संकेश भोईर, स्वप्नाली केणे, अर्पणा भोईर, विनोद केणे आणि शहर प्रमुख बाळा परब यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपी गिरीश वाघमारे याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

आरोपीला आमच्या समोर आणा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मात्र पोलिसांनी संबंधितांची समजूत काढत कठोर कारवाईचे आश्वासन दिले. आरोपी गिरीश वाघमारे याने त्याच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या आणखी काही प्रशिक्षार्थी मुलींसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news