PDO Monsoon Effect: हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज चुकला..? गुजरात पट्टा धुवून काढणारे, अनेक दशके प्रभाव सोडणारे 'PDO' काय आहे?

PDO Monsoon Effect
PDO Monsoon Effectpudhari
Published on
Updated on

Pacific Decadal Oscillation PDO monsoon effect Gujarat rains : गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं उग्र रूप धारण केलं आहे. हा सामान्य मानसून पाऊस नसून हा पाऊस विध्वंस घेऊन आला आहे. फक्त १४ तासात ४०० मीलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळं सर्व नद्यांना पूर आला असून रस्ते पाणीमय झाले आहेत. शेती वाहून जात आहे. जीवन विस्कळीत झालं आहे.

यावरून सोशल मीडियावर हवामान शास्त्रज्ञांमध्ये एक मोठा वाद पेटला आहे. अनेक महिने आधी अल - नीनोची एवढी चर्चा झाली की आता देशात कधी पडला नाही एवढा मोठा दुष्काळ पडणार अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. देशातील हवामान अंदाजानुसार अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी अत्यंत सामान्य पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला.

PDO Monsoon Effect
Monsoon Update | अबब..! भारतावर १० हजार कि.मी. लांबीचा ढगांचा पट्टा!!

काय आहे पॅसिफिक डिकेडल ऑसिलेशन (PDO)?

पॅसिफिक डिकोडल ऑसिलेशन हे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात होणाऱ्या दीर्घ काळाच्या बदलांचा एक पॅटर्न आहे. हे चक्र २० ते ३० वर्षे चालते. हा प्रकार अल नीनो अन् ला नीना सारखाच आहे. मात्र याचा काळ खूप मोठा असतो. अल ज निनो किंवा ला नीना हे काही महिन्यापासून दोन वर्षापर्यंत असतात. तर पीडीओ अनेक दशके आपला प्रभाव सोडते.

PDO Monsoon Effect
Monsoon Hair Care | पावसाळ्यात केस का जास्त गळतात? निरोगी आणि मजबूत केसांसाठी तज्ज्ञांच्या या टिप्स फॉलो करा

PDO ला कमी लेखलं का?

या शास्त्रज्ञांनी पॅसिफिक डिकेडल ऑसिलेशन अर्थात PDO ला कमी लेखलं का अशा प्रश्न देखील विचारला जात आहे. PDO चे दोन प्रमुख टप्पे असतात. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टप्प्यात उत्तर पूर्व किनाऱ्या लगत पाणी गरम होते. तर मध्य - उत्तर पॅसिफिक महासागर थंड होतो.

तर निगेटिव्ह टप्प्यात उलटा पॅटर्न दिसतो. उत्तर पूर्व किनारा थंड तर मध्य भाग अपेक्षेपेक्षा जास्त गरम होतो. सध्याच्या घडीला PDO हा निगेटिव्ह फेजमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. याची इंटेक्स व्हॅल्यू ही १.३ ते १.६ च्या जवळपास आहे.

या ऑसीलेशनमध्ये फक्त समुद्राचे तापमान बदलत नाही तर हवा आणि त्याचा दबाव, त्याची दिशा आणि संपूर्ण ग्लोबचं वातावरण सर्कुलेशन प्रभावित होतं. याचा भारताच्या मॉनसूनवर मोठा परिणाम होतो.

निगेटिव्ह PDO मुळं मॉन्सून मजबूत होतो

शास्त्रीय अभ्यासात असं दिसंत की निगेटिव्ह PDO चा टप्पा भारतातील मॉन्सून मजबूत करतो. तसेच भारतावरील बाष्पयुक्त ढगांचा फ्लो देखील चांगला होतो. पश्चिम पॅसिफिक आणि इंडियन ओशनमधून बाष्प खेचून मॉन्सून ट्रॅफ मजबूत होतो. त्यामुळं भारताच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त काही ठिकाणी तरी अती जास्त पाऊस पडू शकतो.

PDO Monsoon Effect
Wild Vegetables Monsoon Sale | "पावसाळ्यात रानभाज्यांचा दरवळ!; रानभाजी विक्रीतून नाशिकमधील आदिवासी कुटुंबांना मिळाला आर्थिक आधार"

PDO ला आपण कमी लेखलं?

PDO ला कमी लेखण्याची अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे PDO हे अनेक दशके चालणारे चक्र आहे. हवामानाचा अंदाज हा प्रामुख्याने हंगामी असतो. अल - नीनो सारखे शॉर्ट टर्म ड्रायव्हर्स पटकन मॉडल्स कॅप्चर करतात. मात्र PDO सारखे दीर्घकाळ चालणारे चक्र पूर्णपणे समजून घेणे आणि त्याचे मॉडेल तयार करणे आव्हानात्मक असते.

दुसरी बाब म्हणजे मॉडेल्समध्ये PDO ची व्हेरिएबिलिटीला कमी लेखलं जातं. क्लायमेट मॉडेल्स अजूनही डीकेडल व्हेरिएबिलिटी अचुक स्टिम्युलेट करू शकत नाहीये. त्यामुळं जाणकार अंदाज वर्तवताना PDO ची ताकद कमी मोजतात.

PDO Monsoon Effect
Wild Vegetables Monsoon Sale | "पावसाळ्यात रानभाज्यांचा दरवळ!; रानभाजी विक्रीतून नाशिकमधील आदिवासी कुटुंबांना मिळाला आर्थिक आधार"

ग्लोबल वॉर्मिंग PDO च्या निगेटिव्ह फेजला जास्त तीव्र करते. मात्र क्लायमेट मॉडेल्स या गोष्टी पूर्णपणे समजू शकत नाहीत. गुजरातमधील तुफान पाऊस हा फक्त एका सिस्टमचा परिणाम नाहीये तर एका मोठ्या क्लायमेट पॅटर्नचा भाग आहे. निगेटिव्ह PDO ने मॉन्सूनचा ट्रफ दक्षिणेकडे शिफ्ट करण्यास मदत केली आहे. अरबी समुद्रातून सतत बाष्प येत आहे. टोपोग्राफी आणि शहरीकरण या लोकल फॅक्टर्सनी परिस्थिती अजूनच बिघडवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news