Gujarat crime news husband sells wife: पत्नी आवडत नव्हती म्हणून ५० हजारांना विकली... बेपत्ता झाल्याची तक्रार केली, पती फसला

Gujarat crime news husband sells wife
Gujarat crime news husband sells wifepudhari
Published on
Updated on

Gujarat crime news husband sells wife: गुजरातमधील बनासकांठामधील पालनपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ५० हजार रूपयात विकल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आरोपी निकेश पटेलने आपल्या पत्नीला आपल्या मित्रांच्या मदतीनं दुसऱ्या लोकांना विकलं होतं. त्यानंतर आरोपीने पालनपूर पश्चिम पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

Gujarat crime news husband sells wife
Daughter Killed Mother: धक्कादायक! बॉयफ्रेंडवर उडवायला पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईलाच अल्पवयीन मुलीनं संपवलं

पालनपूर पोलिसांनी देखील तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलीस थेट युवतीपर्यंत पोहचले. त्यांनी युवतीकडे चौकशी केली असता तिने निकेश पटेलने त्याचे साथीदार संजय ठाकोर, अशोक ठाकोर आणि सचिन दरबार यांच्या साथीने विवाहितेला ५० हजार रूपयात विकले होते. या सर्वांनी महिलेचे दागिने आधीच काढून घेऊन विकल्याचा देखील आरोप आहे. तसेच युवतीला बंदी बनवून तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

Gujarat crime news husband sells wife
Crime News: संतापजनक! गर्भवती पत्नीच्या गुप्तांगात हेक्सा ब्लेड खुपसून पतीने केली क्रूर हत्या

पतीसह सात आरोपींना अटक

या प्रकरणाची माहिती पालनपूर पश्चिम पोलीस पीआय आर. के. पटेल यांनी दिली आहे. पटेल आणि त्यांच्या टीमने त्वरित कारवाई करत प्रमुख आरोपीसह सात लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी निकेश पटेल यापूर्वी देखील काही गुन्हेगारी प्रकरणात सामील होता. पोलीस सध्या खोलात जाऊन तपास करत आहेत.

Gujarat crime news husband sells wife
Crime News: पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रियकरानेच केली प्रेयसीची निर्घृण हत्या

तपासात धक्कादायक माहिती आली समोर

पोलीस तपासात खुलासा झाला आहे की निकेशभाई वनलालभाई पटेलला आपली पत्नी आवडत नव्हती. त्यामुळेच त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून तिला दुसऱ्या व्यक्तीला ५०,००० रूपयात विकले होते. त्यानंतर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार देखील दाखल केली अन् तो तिथंच फसला.

Gujarat crime news husband sells wife
Crime News | धक्‍कादायक! डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या क्रेटमध्ये लपवला!

पोलीस तांत्रिक आणि मानवी तपास करत संबंधित महिलेपर्यंत पोहचले. त्यानंतर हे वेगळंच प्रकरण आहे हे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्वरित आरोपींना अटक केली. या प्रकरणी मानवी तस्करी, फसवणूक आणि इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news