Bio Gas In CNG PNG: फक्त पेट्रोल डिझेल का... आता सरकार CNG अन् PNG मध्येही बायोगॅस मिसळणार; कधी पासून करणार सुरूवात?

Bio Gas In CNG PNG
Bio Gas In CNG PNGpudhari
Published on
Updated on

Bio Gas In CNG PNG: पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करण्यावरून देशभरात वातावरण तापलं असतानाच आता केंद्र सरकारने बायोगॅस उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय एकीकृत योजान गोबरधन ला मंजुरी दिली आहे. २३ हजार ७३१ कोटी रूपयांची ही योजना दहा वर्षात पूर्ण केली जाणार आहे.

Bio Gas In CNG PNG
Vehicles to Run on Biogas | आता बायोगॅसवर धावणार गाड्या

या योजनेअंतर्गत सीएनजी आणि पीएनजीमध्ये पाच टक्के बायोगॅस ब्लेंड करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या १० वर्षात २३ हजार ७३१ कोटी रूपयांची गोबरधन योजाना पूर्ण केली जाणार आहे.या योजनेअंतर्गत सीएनजी आणि पीएनजीमध्ये पाच टक्के बायोगॅस मिसळण्यात येणार आहे.

Bio Gas In CNG PNG
Biogas Alternative: एलपीजी टंचाईवर उपाय; घरगुती बायोगॅस ठरू शकतो शाश्वत पर्याय

काय आहे गोबरधन योजना?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली. या योजनेअंतर्गत टाकाऊ ओला कचरा, शेण, जैविक कचरा आणि इतर बायोमास वापरून स्वच्छ ऊर्जा, जैविक खत यामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. याद्वारे शहरी गॅस वितरण कंपन्यांना बायोगॅस विकत घ्यायला सुरूवात करतील.

यानंतर आर्थिक वर्ष २०२६ - २७ मध्ये तीन टक्के, २०२७ - २८ मध्ये चार टक्के आणि २०२८ - २९ मध्ये पाच टक्के बायोगॅस पीएनजी आणि सीएनजी मध्ये मिसळण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गोपरधन योजनेचा उद्येश हा घरातील सांडपण्यापासून बायोगॅस (सीबीजी) उत्पादन दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे असल्याचं सांगितलं.

Bio Gas In CNG PNG
Malegaon Reliance Biogas Project Protest | बायोगॅस दुर्गंधीने चिखल ओहोळकर त्रस्त

काँग्रेसने केंद्र सरकारवर आरोप केला आहे की E20 ला घाई घाईत लागू केलं. त्यामुळं पाणी आणि अन्न सुरक्षेवर याचा परिणाम झाला. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितलं की देश जिथं कृषी वेस्ट आणि इतर वेस्टपासून बायोगॅसपासून इथेनॉल तयार केले जाते. भारतात इथेनॉल उत्पादनासाठी ऊस, भात आणि मक्का यावर अवलंबून रहावं लागतं. ऊस आणि धान्य यासाठी मिळून देशाच्या एकूण सिंचनाजे जवळपास ७० टक्के वापर केला जातो.

Bio Gas In CNG PNG
Nitin Gadkari On Ethenol Allegation : माझी राजकीय प्रतिमा स्वच्छच... मुलाच्या इथेनॉल कारखान्यावरून राळ उठवणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार

विमान इंधनात देखील इथेनॉल मिसळणार?

एविएशन टरबाईन फ्युल (ATF) अर्थात विमानाच्या इंधनात देखील इथेनॉल ब्लेड करण्यात येणार अशी चर्चा सुरू होती. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं असून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र राम मोहन नायडू यांनी गुरूवारी पोस्ट करून सांगितलं की विमानाच्या इंधनात इथेनॉल मिसळण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्लॅन नाहीये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news