Vehicles to Run on Biogas | आता बायोगॅसवर धावणार गाड्या

देशातील पहिला बायो-सीएनजी पंप सुरू; पेट्रोलपेक्षा २० रुपये स्वस्त इंधन
Vehicles to Run on Biogas |
Vehicles to Run on Biogas | आता बायोगॅसवर धावणार गाड्या
Published on
Updated on

अहमदाबाद; वृत्तसंस्‍था : गुरांच्‍या शेणापासून तयार होणारा गोबरगॅस किंवा बायोगॅस आतापर्यंत स्‍वयंपाकासाठी वापरला जात होता; पण याच बायोगॅसवर आता आपली वाहनेही धावणार आहेत. ज्या शेणाकडे आपण केवळ खत म्हणून पाहतो, ते शेण आता वाहनांचे इंधन बनत आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात मारुती सुझुकी आणि बनास डेअरीने हा यशस्वी प्रयोग केला आहे. या ‘बायो-सीएनजी’ पंपात दररोज ६०० ते ७०० वाहने इंधन भरत आहेत. विशेष म्हणजे, पेट्रोलपेक्षा हे इंधन २० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. भारतासमोर इंधनपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना ही गुड न्‍यूज भारतीयांना मिळाली आहे.

बायो-सीएनजीचा प्रकल्प नेमका कसा?

‘ब्लूमबर्ग’च्या ताज्या अहवालानुसार, बनासकांठा येथील पंपावर गुरांच्या शेणापासून तयार करण्यात आलेला नैसर्गिक वायू म्हणजेच बायो-सीएनजी विकला जात आहे. ग्रामीण भागात हा बायोगॅस आधीपासूनच अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी वापरला जातो. मात्र, पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपात पहिल्यांदाच वाहनांसाठी वापरला जात आहे. या बायो-सीएनजीचा दर ८० रुपये प्रतिकिलो आहे. या प्लांटसाठी परिसरातील १६ गावांमधून दररोज सुमारे ८८ टन शेण गोळा केले जाते. या शेतकऱ्यांना १ रुपये किलोचा दर दिला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांनाही यातून अतिरिक्त उत्पन्‍न मिळत आहे.

डेअरीचे नेटवर्क आणि मारुती सुझुकीचे भांडवल

बनास डेअरीकडे शेतकऱ्यांचे मोठे नेटवर्क आणि शेणाची उपलब्धता होती, तर सुझुकी समूहाने यासाठी लागणारे भांडवल आणि तंत्रज्ञान पुरवले. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होण्यास मदत झाली आहे. यामध्ये केवळ नवीन इंधनाचा पर्याय उपलब्ध झाला नाही, तर स्थानिक शेतकऱ्यांनाही कमाईचे नवीन साधन मिळाले आहे. बायोगॅस तयार झाल्यानंतर उरलेले शेण पुन्हा शेतकऱ्यांना खत म्हणून विकले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news