Gold Rate Today | सोने महागले, चांदी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

सोन्याच्या तेजीचे कारण काय?
Gold Rate Today Gold Price Today
सोन्याच्या दरात मंगळवारी (दि.१३) प्रति ग्रॅममागे ४८२ रुपयांची वाढ झाली. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोन्याच्या दरात (Gold Rate Today) मंगळवारी (दि.१३) प्रति ग्रॅममागे ४८२ रुपयांची वाढ झाली. तर चांदी प्रति किलोमागे ५२६ रुपयांनी स्वस्त झाली. आज शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७०,३७२ रुपयांवर खुला झाला. सोमवारी हा दर ६९,८९० रुपयांवर बंद झाला होता. चांदीचा दर प्रति किलो ८१,१२४ रुपयांवरुन ८०,५९८ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७०,३७२ रुपये, २२ कॅरेट ६४,४६१ रुपये, १८ कॅरेट ५२,७७९ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४१,१६८ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८०,५९८ रुपयांवर खुला झाला आहे.

सोन्याच्या तेजीचे कारण काय?

आशियाई बाजारात सोमवारी सोन्याचा दर १.७ टक्के वाढला होता. आता तो सुमारे प्रति औंस २,४७० डॉलरवर गेला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संभाव्य संघर्षाच्या भीतीने सेफ हेवन मालमत्ता म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. परिणामी दर वाढला आहे.

Gold Price Today : शुद्ध सोने 'असे' ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट (९९९) हे शुद्ध सोने समजले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे आहेत. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट (18 Carat Gold Rate) सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. १४ कॅरेट दागिन्यावर ५८५ असे नमूद केलेले असते.

Gold Rate Today Gold Price Today
Nashik Gold News | सोन्याचे दर होणार एकसमान; 'मजुरी'तील तफावत कशी रोखणार?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news