Nashik Gold News | सोन्याचे दर होणार एकसमान; 'मजुरी'तील तफावत कशी रोखणार?

'वन नेशन वन गोल्ड रेट' : ६ ते २४ टक्क्यांपर्यंतचा फरक
 'One Nation, One Gold Rate' policy
'One Nation, One Gold Rate' policypudhari news network
Published on
Updated on
नाशिक : सतिश डोंगरे

प्रादेशिक अडथळे दूर करून सोन्याचे दर प्रमाणित करण्यासाठी तसेच पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी 'वन नेशन, वन गोल्ड रेट' हे धोरण केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. या धोरणाचे सराफांकडून विशेषत: पारंपारिक सराफांकडून स्वागत केले जात असले तरी, 'मजुरी'तील तफावत ग्राहकांसाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय काॅर्पाेरेट आणि पारंपारिक सराफ व्यावसायिकांमध्ये आता मजुरीवरून स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे. (The jewelry industry has come together to implement the 'One Nation, One Gold Rate' policy)

'वन नेशन, वन गोल्ड रेट' धोरण

सद्यस्थितीत स्थानिक कर आणि बाजार परिस्थितीतील फरकांमुळे सोन्याच्या दरात प्रादेशिक असमानता प्रकर्षाने दिसून येते. ही असमानता ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी नेहमीच गैरसोयीची ठरली आहे. या पार्श्वभूमीवर देशात 'वन नेशन, वन गोल्ड रेट' धोरण लागू करण्यासाठी ज्वेलरी उद्योग एकत्र आला आहे. या धोरणाचे काॅर्पोरेटसह पारंपारिक व्यावसायिकांनी स्वागत केले असले तरी, याचा लाभ नेमका कोणाला होईल, अशी चर्चा आता व्यावसायिकांमध्ये रंगत आहे. ज्वेलरी उद्योगात सध्या काॅर्पोरेट विरुद्ध पारंपारिक असा सामना बघावयास मिळत असल्याने, 'वन नेशन वन गोल्ड रेट' या धोरणामुळे तो संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मात्र, 'मजुरी' या सामन्याचा दुसरा अध्याय ठरण्याची भिती आहे.

काॅर्पोरेट व्यावसायिकांमध्ये मजुरी ६ टक्क्यांपासून थेट २४ टक्क्यांपर्यंत आकारली जाते. तर, पारंपारिक व्यावसायिक ६ ते १४ टक्के अशी मजुरी आकारतात. अर्थात मजुरी ही दागिन्याच्या घडणावळीनुसार आकारली जात असली तरी, काॅर्पाेरेट व्यावसायिकांकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधाही मजुरी वाढीस कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दर समसमान झाल्यास, मजुरीतील तफावत पारंपारिक आणि काॅर्पोरेट व्यावसायिकांचे ग्राहक निश्चित करणार असल्याची चर्चा सध्या या उद्योगात रंगत आहे.

 'One Nation, One Gold Rate' policy
Nashik Industry News | महिंद्राचे मदर युनिट नाशिकला प्रकल्प मात्र गुजरातला

यामुळे सोन्याच्या दरात तफावत

कर, वाहतुक खर्च, स्थानिक मागणी आणि सरकारी धोरणांसह अनेक कारणांमुळे सोन्याची किंमती राज्यानुसार बदलतात. सोन्याची मागणी आणि पुरवठा तसेच इतर स्थानिक आर्थिक घटकदेखील सोन्याचे दर ठरविण्यात भूमिका बजावतात. याव्यतिरिक्त प्रत्येक शहरात स्वत:चे सोनार आणि ज्वेलर्स यांचे दर वेगवेगळे असतात, ते त्यांच्या कारागिरीसाठी वेगवेगळे शुल्क आकारू शकतात. तसेच वाहतुक खर्च, सुरक्षा आदींमुळे देखील राज्यानुसार सोन्याचे दर बदलतात.

मजुरी वाढीची कारणे अशी...

  • सराफ व्यावसायिकांकडून ६ ते २४ टक्क्यांपर्यंत आकारली जातेय मजुरी.

  • दागिन्यांवर जितके अधिक नक्षीकाम तितकी मजुरी अधिक.

  • पारंपारिक सराफांच्या तुलनेत ब्रॅण्डेड सराफांकडून अधिक मजुरी आकारली जाते.

पारंपारिक सराफांचा मेकओव्हर

ज्वेलरी उद्योगात काॅर्पोरेट क्षेत्राच्या प्रवेशाचा पारंपारिक उद्योगाला मोठा फटका बसत आहे. आपल्या पिढ्यांपिढ्याच्या ग्राहकांच्या विश्वासावर पारंपारिक सराफ तग धरून असले तरी, काॅर्पोरेट उद्योगांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी देखील मेकओव्हर केला आहे. ग्राहकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सराफी पेढ्यांचा साज व्यावसायिकांकडून बदलला जात आहे. ऑनलाइन पेमेंट, इन्शुरन्स आदी सुविधाही पारंपारिक सराफांकडून दिल्या जात आहेत.

'वन नेशन, वन गोल्ड रेट' या धोरणाचा पारंपारिक सराफ व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. कारण आमच्याकडून आकारली जाणारी मजुरी तुलनेत कमी आहे. शिवाय ग्राहकांशी आमची बांधिलकी आहे. पारंपारिक व्यावसायिकांनी देखील आधुनिकतेची कास धरली आहे.

गिरीष नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news