Gold Rate: भारतात सोन्याची किंमत वाढली पण मागणी ५९ टक्क्यांनी घटली; वर्ल्ड गोल्ड कौन्सिलची माहिती

गतवर्षीच्या तुलनेत सोन्याची आयात घटून ४ अब्ज डॉलरवर
Gold Rate
Gold Rate: भारतात सोन्याची किंमत वाढली पण मागणी ५९ टक्क्यांनी घटली;
Published on
Updated on

नवी दिल्ली ः वाढलेल्या किमतीमुळे नोव्हेंबरमध्ये भारत आणि चीनमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी घटली आहे. सोन्यावर आधारित एक्सचेंज-ट्रेडेड फंड्समधील (ईटीएफ) गुंतवणूक कायम आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोन्याची आयात ५९ टक्क्यांनी घटून ४ अब्ज डॉलरवर आली असल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) संशोधन प्रमुखांनी दिली.

Gold Rate
Gold Rate Hike : सोन्याचा भाव 1.90 लाखांवर जाणार; अजूनही तेजीचे संकेत

देशांतर्गत सोन्याच्या किमतीमध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिली जाणारी सूट प्रतिऔंस (२८.३४ ग्रॅम) ११ डॉलरवरून १२ डिसेंबरपर्यंत ३० डॉलरपर्यंत वाढली आहे. दागिन्यांची मागणी मंदावली असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे डब्ल्यूजीसीच्या भारत विभागाच्या संशोधन प्रमुख कविता चॅको यांनी सांगितले. भारतातील मागणीतील मंदीचा आणखी एक संकेत म्हणजे नोव्हेंबरमध्ये आयातीत झालेली ७३ टक्क्यांची घट. गतवर्षीच्या तुलनेत आयात ५९ टक्क्यांनी घटून ४ अब्ज डॉलरवर आली आहे. सणासुदीनंतर मागणी आणि आयातीतील ही पहिलीच घट आहे. सणासुदीनंतरची मागणी घटल्यामुळे नोव्हेंबरमधील सोने आयातीचे प्रमाण ३२ ते ४० टनांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे.  

चीनमधील आयातही घटली...

चीनच्या डब्ल्यूजीसीचे संशोधन प्रमुख रे जिया म्हणाल्या की, ऑक्टोबरमध्ये चीनची सोन्याची आयात सप्टेंबरमधील ५७ टनांवरून ३६ टनांपर्यंत आली आहे. तर, गतवर्षी याच कालावधीत चीनमध्ये ४३ टन सोन्याची आयात करण्यात आली होती.

Gold Rate
Gold-Silver Price| चांदीचे दर सर्वकालीन उच्चांकावर; नव्या वर्षात चांदी दर आणखी वाढण्याचा अंदाज

ईटीएफमध्ये होतेय गुंतवणूक...

भारतात, नोव्हेंबरमध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक मागील दोन महिन्यांच्या तुलनेत मंदावली आहे. ईटीएफमधील निव्वळ गुंतवणूक ३,७४० कोटी रुपये (४२.१ कोटी डॉलर) होती. ऑक्टोबरच्या तुलनेत ईटीएफमधील गुंतवणूक निम्मी झाली आहे. वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांतील सरासरी मासिक गुंतवणूक २,७६० कोटी रुपये (३१.५ कोटी डॉलर) आहे. त्याहून नोव्हेंबरमधील गुंतवणूक अधिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news