

Gold Rate Hike Gold Prices May Touch ₹1.90 Lakh
नवी दिल्ली : सोन्याच्या भावातील तेजी 2025 प्रमाणे 2026 मध्येही कायम राहील. सोन्याचा प्रतिऔंस (28.34 ग्रॅम) भाव 6 हजार डॉलरवर (5.42 लाख रुपये) जाईल, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड टेट यांनी सांगितले.
पुढील वर्षी सोन्याचे भाव वाढतेच राहण्याची शक्यता आहे. यावर्षीची स्थिती कायम राहू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी सोन्याचा प्रतिऔंस भाव 4 हजार 321 डॉलरवर गेला होता. सध्या होत असलेली भाववाढ अल्पकालीन दरात होणारी वध-घट नाही. काही संरचनात्मक शक्तींद्वारे हे बदल झाले आहेत.
याशिवाय चीनने सोने खरेदीचे नियम शिथिल केले असून जपानमध्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संपत्ती हस्तांतर प्रक्रियेने वेग घेतला आहे. त्यामुळे सोन्याच्या भाववाढीला हातभार लागत असल्याचे टेट म्हणाले. दरम्यान, चांदीच्या दरानेही बुधवारी 2 लाख 6 हजार रुपये प्रतिकिलोचा विक्रमी टप्पा गाठला आहे.