Gold Prices Today | सोने आणखी महागले, चांदी दरात घट, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

काय आहे सोन्याचा प्रति तोळ्याचा दर?
Gold Prices Today
सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Prices Today) वाढ सुरुच आहे. आज गुरुवारी (दि.१८) शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७४,०६५ रुपयांवर पोहोचला. दरम्यान, प्रति किलो ९२ हजारांवर गेलेला चांदीचा दर (Silver Price Today) ९१,६१४ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, मंगळवारी १६ जुलै रोजी शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७३,३३९ रुपयांवर होता. तो आज गुरुवारी (दि.१८) प्रति १० ग्रॅम ७४,०६५ रुपयांवर खुला झाला. तसेच २२ कॅरेटचा दर ६७,८४४ रुपये, १८ कॅरेट दर ५५,५४९ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४३,३२८ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ९१,६१४ रुपयांवर आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही दरात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातही गुरुवारी सोन्याच्या किमती वाढल्या. स्पॉट गोल्डचा दर ०.१ टक्के वाढून प्रति औंस २,४६१.२७ डॉलरवर गेला आहे. बुधवारी सोन्याने प्रति औंस २,४८३.६० डॉलरचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. (एक औंस म्हणजे २८ ग्रॅम सोने)

Gold Prices Today
Stock Market Updates | सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट, 'हे' शेअर्स फोकसमध्ये

सोने दरवाढीचे कारण काय?

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करेल, या शक्यतेने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. तसेच भू-राजकीय तणावाची स्थिती आणि चीनकडून मागणी वाढल्यानेही किंमती वाढल्या असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट (९९९) हे शुद्ध सोने समजले जाते. पण, दागिने घडणावळीसाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असा उल्लेख केलेला असतो. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Gold Prices Today
दक्षता : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी...

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news