High Court on Gen Z language : 'इन्स्टा' मेसेसद्वारे केलेले कौतुक म्हणजे गुन्हा नाही! कर्नाटक हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Court News
Court Newsfile photo
Published on
Updated on

बंगळुरू : इन्स्टाग्रामवर मैत्रिणीला पाठवलेल्या एका वैयक्तिक मेसेजवरून थेट पोलीस तक्रार आणि डिजिटल उपकरणांची जप्ती याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तरुण पिढीच्या संवादाची भाषा (Youthful Vocabulary) किंवा कपड्यांवर केलेल्या वैयक्तिक कौतुकाला गुन्हेगारीचे रूप देऊन कायदेशीर शस्त्रासारखा वापर करू नका, अशा शब्दांत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

१९ वर्षांच्या एका राज्यस्तरीय अंडर-१९ क्रिकेटपटूने त्याच्या २० वर्षांच्या वर्गमैत्रिणीला इन्स्टाग्रामवर “U kinda look so hot in light coloured clothes” (तू फिकट रंगाच्या कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसतेस) असा प्रायव्हेट मेसेज (Direct Message) केला होता. ही बाब जेव्हा त्या तरुणीच्या वडिलांच्या निदर्शनास आली, जे कर्नाटक पोलीस सेवेत (IPS) उच्चपदस्थ अधिकारी आहेत तेव्हा या प्रकरणाला मोठे वळण लागले. बंगळुरूच्या अशोकनगर पोलीस ठाण्यात या मुलावर थेट गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्याचा लॅपटॉप व मोबाईल जप्त केला.

Court News
Meta apologises PM Modi video : मेटाकडून चूक मान्य; PM मोदींचा फेसबूक व्हिडिओ ब्लॉक केल्याबद्दल मागितली माफी

ही गोष्ट त्या तरुणीच्या वडिलांना समजली, जे कर्नाटकात उच्चपदस्थ आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. त्यामुळे या प्रकरणाला मोठे वळण मिळाले. बंगळुरूच्या अशोकनगर पोलीस ठाण्यात त्या मुलावर थेट गुन्हा करण्यात आला. तसेच कारवाईदरम्यान, पोलिसांनी मुलाचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला.

भविष्य पणाला लागले होते

तक्रार दाखल झाली तेव्हा हा तरुण तमिळनाडूच्या अंडर-१९ संघातून खेळण्यासाठी तयारी करत होता. मात्र, या कायदेशीर कारवाईमुळे त्याचे क्रीडा क्षेत्रातील करिअर आणि भविष्य टांगणीला लागले होते. यामुळे या खेळाडूने दाखल झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.

Court News
Jharkhand Student Protest: कोण आहे देवेंद्रनाथ महतो? विधानसभा-लोकसभा लढवणारा नेता अचानक कसा बनला विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा?

उच्च न्यायालयाचे निरीक्षण आणि निकाल

न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, ‘हा केवळ दोन मित्रांमधील एक साधा आणि तात्कालिक डिजिटल संवाद होता. त्याला विनाकारण वाढवून गंभीर गुन्हेगारी स्वरूप देण्यात आले.’

न्यायालयाने तरुणाविरुद्ध दाखल झालेली FIR पूर्णपणे रद्द केली असून, पोलिसांनी जप्त केलेले त्याचे मोबाईल आणि लॅपटॉप तातडीने परत करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे ऐन उमेदीच्या काळात कारवाईचा सामना करणाऱ्या त्या तरुण क्रिकेटपटूला मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news