Gen Z dating trends: जेन झी मुले सिंगल, तरुणींना मात्र आवडतात मिलेनियल; नेमकं कारण काय? अहवालात मोठा खुलासा

सध्या एक रंजक ट्रेंड समोर आला असून, जेन झीमधील तरुणी आपल्याच वयाच्या मुलांऐवजी मिलेनियल पुरुषांच्या प्रेमात पडत असल्याचे दिसून येत आहे.
Gen Z dating
Gen Z datingfile Photo
Published on: 
Updated on: 

Gen Z dating trends

नवी दिल्ली: आजच्या डेटिंगच्या जगात, केवळ वय आणि बाह्य रूपालाच महत्त्व उरलेले नाही. विशेषतः जेन झी मधील तरुण-तरुणी आपल्या आवडीनिवडींबाबत अत्यंत स्पष्ट राहतात. त्यांच्यासाठी जोडीदाराचे व्यक्तिमत्त्व, समजून घेण्याची वृत्ती आणि नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. यातच एक नवीन ट्रेंड समोर आला असून, जेन झी मधील तरुणी आपल्याच वयाच्या मुलांऐवजी मिलेनियल पुरुषांच्या प्रेमात पडत असल्याचे दिसून येत आहे.

अहवालातील आकडेवारी आणि कारणे

'यॉर्क व्हिजन'मध्ये २२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, जेन झी मुलांमध्ये सिंगल राहण्याचे प्रमाण तब्बल ६० टक्के आहे, तर जेन झी तरुणींमध्ये हा आकडा सुमारे ३० टक्के इतका आहे. या फरकामागचे एक प्रमुख कारण म्हणजे काही तरुण-तरुणी वयाने मोठे असलेल्या जोडीदाराची निवड करत आहेत. मात्र, यामध्ये केवळ वयाचे अंतर नसून दोन्ही पिढ्यांच्या जडणघडणीत आणि विचारांमध्ये मोठा फरक असल्याचे यातून स्पष्ट होते.

Gen Z dating
Dopamine Dating: Gen-Z ला प्रेम नको, फक्त ‘डोपामाइन’चा आनंद हवा? काय आहे हा नवा डेटिंग ट्रेंड?

दोन पिढ्यांच्या मानसिकतेतील अंतर

मिलेनियल पुरुषांनी आपले बालपण आणि तरुणपण अशा काळात घालवले, जेव्हा सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्स आजच्याइतके नव्हते. त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून नाती फुलवली. याउलट, जेन झीची पिढी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या सततच्या सहवासात मोठी झाली आहे. या अहवालानुसार, मिलेनियल पुरुष अधिक समजूतदार, दिखावा न करणारे आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणे वागणारे वाटत असल्याने अनेक जेन झी तरुणी त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. जोडीदाराने समोरासमोर बसून मोकळेपणाने बोलणे, भावना स्पष्टपणे मांडणे आणि त्यांना समजून घेणे, या गोष्टी आजच्या तरुणींना अधिक भावत आहेत.

पुरुषांमध्ये वाढतोय एकटेपणा

या अहवालात पुरुषांमधील एकटेपणाच्या समस्येवरही चर्चा केली आहे. अनेक तरुणांकडे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा मोकळेपणाने बोलण्यासाठी, भक्कम आधार देणारे कोणी नसते. मात्र, या लेखानुसार, केवळ नवीन नातेसंबंध हा यावर उपाय नाही; तर उत्तम नातेसंबंध निर्माण करण्यासाठी स्वतःच्या भावना समजून घेणे आणि त्या जोडीदारासोबत योग्य प्रकारे व्यक्त करणे आवश्यक असते. यामुळेच काही जेन झी तरुणी अशा जोडीदारांच्या शोधात आहेत, जे त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगतील. त्यांना अशा व्यक्तीसोबत राहायचे आहे, जो नात्यामध्ये समंजसपणा आणि आदराला महत्त्व देतो.

दरम्यान, याचा अर्थ असा नाही की सर्वच जनरेशन झेडच्या मुलींना मिलेनियल पुरुष आवडतात. वयाने मोठ्या असलेल्या जोडीदाराला डेट करणे ही काही नवीन गोष्ट नाही; परंतु आजच्या काळात केवळ वय नव्हे तर संवाद कौशल्य, मानसिक परिपक्वता आणि नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांसारखे घटक अधिक महत्त्वाचे ठरत आहेत.

Gen Z dating
Gen z fake Wedding Trends: दारात मांडव, लगीनघाई अन् पंगती... पण नवरा-नवरीच नाही! 'जेन-झी'मध्ये का वाढतोय 'फेक वेडिंग'चा ट्रेंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news