Dopamine Dating: Gen-Z ला प्रेम नको, फक्त ‘डोपामाइन’चा आनंद हवा? काय आहे हा नवा डेटिंग ट्रेंड?

सध्या 'डोपामाइन डेटिंग'ची खूप चर्चा आहे. हा ट्रेंड केवळ नव्या नात्यांसाठीच नव्हे, तर जुन्या नात्यात पुन्हा ताजेपणा आणण्यासाठीही उपयोगी ठरू शकतो. काय आहे हा नवा डेटिंग ट्रेंड जाणून घ्या.
Dopamine Dating
Dopamine DatingAI Image
Published on
Updated on

Dopamine Dating

नवी दिल्ली : एकेकाळी लोक आपली नाती खासगी ठेवायचे, पण सोशल मीडियाच्या युगात नाती खूप सार्वजनिक झाली आहेत. परिणामी, डेटिंगचे नवीन प्रकार वारंवार चर्चेत येतात; सध्या 'डोपामाइन डेटिंग'ची खूप चर्चा आहे. यात गंभीर नात्यापेक्षा उत्साह, आनंद आणि नवीनपणाची अनुभूती यांना अधिक महत्त्व दिले जाते. विशेष म्हणजे, हा ट्रेंड केवळ नव्या नात्यांसाठीच नव्हे, तर जुन्या नात्यात पुन्हा ताजेपणा आणण्यासाठीही उपयोगी ठरू शकतो.

डोपामाइन डेटिंग म्हणजे काय?

'डोपामाइन डेटिंग'चा अर्थ अगदी स्पष्ट आहे: यात भावनिक जवळीक किंवा बंधनापेक्षा 'डोपामाइन'च्या (आनंद देणाऱ्या रसायनाच्या) निर्मितीला किंवा अनुभवाला अधिक महत्त्व दिले जाते. या पद्धतीचे डेटिंग करणारे लोक गंभीर नाते किंवा वचनबद्धतेच्या शोधात नसतात; ते केवळ वेळ घालवण्यासाठी सोबती शोधत असतात. आजकाल कंटाळा घालवण्यासाठी लोक या ट्रेंडचे अनुसरण करत आहेत.

यासाठी अनेक जण थेट डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. एखाद्या नवीन व्यक्तीशी संवाद सुरू झाल्यानंतर मिळणारा उत्साह आणि नवीनपणाची भावना मेंदूमध्ये डोपामिनच्या निर्मितीशी जोडली जाते. डोपामिन हे मेंदूतील आनंद, प्रेरणा आणि उत्साहाशी संबंधित रसायन असल्याने या डेटिंग ट्रेंडला ‘डोपामिन डेटिंग’ असे म्हटले जाते.Relationships

Dopamine Dating
Relationship tips: लग्नानंतर नवविवाहित मुली गुगलवर काय सर्च करतात?

जुन्या नात्यातही आणता येतो नवा उत्साह

‘डोपामिन डेटिंग’चा आणखी एक पैलू म्हणजे दीर्घकाळ चाललेल्या नात्यात पुन्हा उत्साह निर्माण करणे. नात्याच्या सुरुवातीला जाणवणारा उत्साह काही काळानंतर कमी होऊ शकतो. मात्र, नात्यात नवीन अनुभव, आनंददायी क्षण आणि उत्स्फूर्तपणा कायम ठेवला, तर त्यातून पुन्हा या भावना निर्माण केल्या जाऊ शकतात.

नात्यात स्वतःची ओळख जपा

नाते टिकवताना स्वतःची स्वतंत्र ओळख जपणेही महत्त्वाचे आहे. मित्रमैत्रिणींना भेटणे, आपले छंद जोपासणे आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे यामुळे व्यक्तीचे स्वतःचे आयुष्यही समृद्ध राहते. त्यातून जोडीदारासोबत शेअर करण्यासाठी नवीन अनुभव आणि विषय मिळतात. परिणामी, नात्यातील भावनिक जवळीक वाढण्यास मदत होऊ शकते.

नात्यात आनंदी आणि उत्साही राहा

जोडीदारासमोर सतत दुःख किंवा चिडचिड व्यक्त केल्याने नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी नात्यात विनोद, खेळकरपणा आणि सकारात्मकता टिकवण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. एकमेकांसोबत आनंदी क्षण घालवल्याने नात्यातील उत्साह कायम ठेवण्यास मदत होऊ शकते.

नात्यात घाई करू नका

दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यासाठी संयम महत्त्वाचा आहे. नात्याला वेळ द्या आणि प्रत्येक गोष्ट घाईने करण्याऐवजी हळूहळू एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, त्याच्या भावना समजून घ्या आणि एकत्र नवीन अनुभव घ्या. अशा छोट्या प्रयत्नांमधून नात्यातील ताजेपणा आणि उत्साह दीर्घकाळ टिकवता येऊ शकतो.

Dopamine Dating
Relationship Tips: प्रेमात तुम्ही स्वतःला हरवून बसला आहात का? थेरपिस्टने सांगितलेली 'ही' ३ लक्षणे वेळीच ओळखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news