Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार? पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीची शक्यता; ५-७ दिवसांत सरकार निर्णय घेणार

केंद्र सरकार येत्या ५ ते ७ दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
Petrol, Diesel and LPG Supply
Petrol, Diesel and LPG SupplyPudhari
Published on
Updated on

Petrol Diesel Price Hike

नवी दिल्ली: गेल्या काही काळापासून स्थिर असलेले इंधन दर आता कडाडण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार येत्या ५ ते ७ दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

अशी असू शकते दरवाढ

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होऊ शकते. तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. जर या दरवाढीला मंजुरी मिळाली, तर गेल्या जवळपास चार वर्षांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमधील ही पहिलीच वाढ ठरेल; कारण २०२२ पासून किरकोळ विक्री दर बऱ्याच अंशी स्थिर ठेवण्यात आले होते.

Petrol, Diesel and LPG Supply
Hormuz Strait | ‘नाकेबंदी’ची मीमांसा

किमती वाढण्यामागची प्रमुख कारणे काय?

पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन वर्षांपासून किरकोळ विक्रीचे दर स्थिर असल्याने तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 'अंडर रिकव्हरी'मुळे कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेच दरवाढ होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते, मात्र आता वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत.

किंमतवाढीबाबत ५-७ दिवसांत निर्णय अपेक्षित

सरकार सध्या पश्चिम आशियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एका बाजूला तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी करणे आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवणे, असा दुहेरी पेच सरकारसमोर आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्च आणि पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होतो, त्यामुळे हा निर्णय घेताना मध्यमवर्गीयांच्या बजेटचाही विचार केला जात आहे. येत्या ५ ते ७ दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी करणे आणि कोणत्याही दरवाढीमुळे महागाईत लक्षणीय वाढ होणार नाही याची खात्री करणे, या दोन्ही बाबींमध्ये समतोल साधण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Petrol, Diesel and LPG Supply
Flex Fuel Vehicles | ‘फ्लेक्स फ्युएल’चा पर्याय कशासाठी?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news