FSSAIचा मोठा निर्णय: मीठ, साखर, चरबीचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांवर 'इशारा लेबल्स'! कंपन्यांना १ वर्षाचा अल्टिमेटम

सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर, एकाच टप्प्यात अंमलबजावणीची योजना
FSSAI Warning Labels
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

FSSAI warning label rule for packaged food : मीठ, साखर किंवा फॅट्सचे (चरबी) प्रमाण जास्त असणाऱ्या पॅकबंद पदार्थांच्या पाकिटावर समोरच्या बाजूलाच स्पष्ट दिसेल असे 'इशारा लेबल' (Warning Label) लावले जावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) आणला आहे. FSSAI ने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, 'फ्रंट-ऑफ-पॅक न्यूट्रिशन लेबलिंग' (FoPL) एकाच टप्प्यात लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे कोणते पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत, हे ग्राहकांना चटकन ओळखता येईल. मसुदा नियमावली जारी करण्याच्या आणि अंतिम करण्याच्या प्रक्रियेसाठी साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी आवश्यक असेल, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केली होती विचारणा?

सर्वोच्च न्यायालयाने पॅकबंद पदार्थांच्या पाकिटावर समोरच्या बाजूलाच स्पष्ट दिसेल असे 'इशारा लेबल' (Warning Label) अंमलबजावणीची कालमर्यादा स्पष्ट करण्याचा आदेश केंद्र सरकारसह भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला (FSSAI) दिला होता. विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात 'चिंताजनक पोषक घटक' असणाऱ्या पॅकबंद खाद्यपदार्थांच्या दर्शनी भागावर पांढऱ्या चौरस पार्श्वभूमीवर लाल रंगाचा षटकोन (सहा बाजू असलेला आकार) दर्शवणे अनिवार्य असेल, असेही स्पष्ट केले होते.

FSSAI Warning Labels
FSSAI Analogue Paneer ban: 'मुंढे' इफेक्ट? ॲनालॉग पनीरवर देशभरात बंदीची तयारी; FSSAIने बोलावली महत्त्वाची बैठक

इशारा लेबलचा हेतू काय?

विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात 'चिंताजनक पोषक घटक' असणाऱ्या पॅकबंद खाद्यपदार्थांच्या पाकिटावर एका पांढऱ्या रंगाच्या चौकोनात 'लाल रंगाचा षटकोन' (सहा बाजू असलेली आकृती) छापलेला असेल. याचा उद्देश ग्राहकांना खरेदीच्या वेळी स्पष्ट आणि सहज समजण्याजोगी पोषणविषयक माहिती देणे हा आहे. ग्राहकांना खाद्यपदार्थांबाबत योग्य निर्णय घेता येतील.

FSSAI Warning Labels
FSSAI ची मोठी कारवाई: एव्हरेस्टसह 'लालजी गोधू; ब्रँड्सच्या हिंगाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

एकाच टप्प्यात अंमलबजावणीची योजना

FSSAI ने स्पष्ट केले की, 'फ्रंट-ऑफ-पॅक न्यूट्रिशन लेबलिंग' (FoPL) ची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याऐवजी एकाच टप्प्यात करण्याची त्यांची योजना आहे. इशारा लेबलचे हे स्वरूप कॅनडाने स्वीकारलेल्या मॉडेलसारखेच आहे आणि ते अशा पोषक घटकांना अधोरेखित करण्यासाठी तयार केले गेले आहे. प्रस्तावानुसार, चिंताजनक पोषक घटकांपैकी (उदा. मीठ, साखर किंवा चरबी) एखादा घटकही विहित मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर चेतावणी लेबल लावणे आवश्यक असेल. अशा परिस्थितीत, संबंधित पोषक घटक लाल षटकोनाच्या आत दर्शविला जाईल. जर दोन किंवा तीन पोषक घटक मर्यादेपेक्षा जास्त असतील, तर त्या सर्व घटकांचा उल्लेख एकाच चेतावणी चिन्हामध्ये केला जाईल.

FSSAI Warning Labels
FSSAI Warning Labels : सुप्रीम कोर्टाचा बडगा, अखेर FSSAI वठणीवर! पॅकबंद पदार्थांच्या पाकिटांवर आता दिसणार 'धोक्याचा सिम्बॉल'

... तरीही त्या पाकिटावर इशारा लेबल छापणे सक्तीचे

FSSAI ने याबाबत आणखी एक बाब स्पष्ट केली आहे. एखाद्या पॅकिंगच्या पदार्थात मीठ, साखर किंवा फॅट्स या तिन्ही गोष्टी जास्त नसतील; पण त्यापैकी एखादाच घटक (उदा. फक्त साखर किंवा फक्त मीठ) जरी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तरीही त्या पाकिटावर 'इशारा लेबल' छापणे सक्तीचे असणार आहे.

कंपन्यांना १ वर्षाचा अल्टिमेटम

नवीन नियमाची तत्‍काळ अंमलबजावणी केली जाणार नाही. या नियमाला अंतिम स्वरूप देण्याआधी सामान्य नागरिक आणि अन्न उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी सविस्तर चर्चा केली जाईल. त्यांच्या हरकती आणि सूचना जाणून घेतल्या जातील. FSSAI च्या अंदाजानुसार, ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आणि चर्चा पूर्ण करून या नियमाचा अंतिम मसुदा (Draft) तयार करण्यासाठी साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अन्न प्राधिकरणाने म्हटलं आहे की, प्राधिकरणाच्या ४८ व्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता की, FSS (लेबलिंग आणि डिस्प्ले) नियमांमधील सुधारणा तसेच इतर अन्न सुरक्षा आणि मानके नियमांमधील लेबलिंग आवश्यकतांमधील बदल हे अधिसूचनेच्या तारखेपासून किमान ३६५ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर १ जुलै रोजी लागू होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news