FSSAI: जागो ग्राहक जागो! खाद्य उत्पादनांच्या पॅकेजिंगवरील फसव्या दाव्यांवर आता थेट तक्रार करता येणार

FSSAI चा नवा उपक्रम; मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना अन्न सुरक्षा रक्षक बनवण्याचा उपक्रम
FSSAI चा नवा उपक्रम; मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना अन्न सुरक्षा रक्षक बनवण्याचा उपक्रम
Food product packagesPudhari
Published on
Updated on

Through FSSAI app Consumers can directly report misleading claims made on food products

नवी दिल्ली: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) खाद्य उत्पादनांवरील खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे थांबवण्यासाठी एक नवा डिजिटल उपाय सुरू केला आहे.

आता ग्राहक Food Safety Connect या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून किंवा FoSCoS पोर्टलवरून अशा फसव्या दाव्यांविरोधात थेट तक्रार दाखल करू शकतात.

अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी घेतलेला हा निर्णय ग्राहकांना सशक्त बनवत असून, अन्न लेबलिंगमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

नवीन डिजिटल सुविधा

FSSAI अन्न उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियंत्रण करते, तसेच अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानके निश्चित करते. FSSAI ने बुधवारी एक नवीन डिजिटल सुविधा सुरू केल्याची घोषणा केली.

FSSAI च्या अधिकृत निवेदनानुसार, “ग्राहक आता Food Safety Connect मोबाईल अ‍ॅप्लिकेशन किंवा Food Safety Compliance System - FoSCoS – https://foscos.fssai.gov.in या प्लॅटफॉर्मद्वारे पॅकबंद अन्न उत्पादनांवरील खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे याविरोधात तक्रार नोंदवू शकतात.”

Food Safety Connect हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. पारदर्शकता वाढविणे, ग्राहकांचे हक्क संरक्षित करणे आणि देशातील अन्न सुरक्षा नियम अधिक बळकट करणे यासाठीच्या FSSAI च्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

FSSAI चा नवा उपक्रम; मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना अन्न सुरक्षा रक्षक बनवण्याचा उपक्रम
Caste Census : जातनिहाय जनगणना म्हणजे काय? तिचे फायदे काय? अशी गणना कधी झाली आहे का? जाणून घ्या सविस्तर

अशी करा तक्रार...

या नव्या सुविधेमुळे ग्राहक लेबलवरील दिशाभूल करणारा दावा दर्शविणारा फ्रंट-ऑफ-पॅक फोटो, उत्पादकाचा FSSAI परवाना किंवा नोंदणी क्रमांक आणि उत्पादन ऑनलाइन विकले जात असल्यास ई-कॉमर्स URL अशी आवश्यक माहिती सहजपणे सबमिट करू शकतात.

ही माहिती नियामक अधिकाऱ्यांना अयोग्य अन्न व्यवसाय ऑपरेटरांवर वेळीच आणि पुराव्यावर आधारित कारवाई करण्यात मदत करेल, असे निवेदनात म्हटले आहे.

ग्राहक केंद्रित पाऊल

हे ग्राहक केंद्रित पाऊल FSSAI च्या खाद्य सुरक्षा आणि मानके (जाहिरात आणि दावे) नियम, 2018 आणि लेबलिंग आणि डिस्प्ले नियम, 2020 याअंतर्गतच्या नियामक चौकटीचा भाग आहे.

या नियमांनुसार अन्न उत्पादनांवरील सर्व दावे सत्य, स्पष्ट, अर्थपूर्ण, गैरवळण न देणारे आणि दिशाभूल न करणारे असावेत, तसेच पोषणमूल्य किंवा आरोग्यविषयक दावे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केलेले असणे आवश्यक आहे.

हा पुढाकार FSSAI च्या जाहिरात आणि दावे निरीक्षण समिती (AMC) च्या कार्यपद्धतीशी सुसंगत आहे, जी लेबल आणि जाहिरातांतील दावे तपासून नियामक पालन सुनिश्चित करते.

FSSAI चा नवा उपक्रम; मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना अन्न सुरक्षा रक्षक बनवण्याचा उपक्रम
Sundar Pichai Salary: गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना रेकॉर्ड ब्रेक पगार; आकडा ऐकून धक्का बसेल, सुरक्षेवरच 71 कोटी खर्च

नागरिकांना आवाहन

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “नवीन तक्रार यंत्रणा ग्राहकांना FSSAI ची डोळे व कान बनवून मूलभूत पातळीवरील दक्षता अधिक बळकट करते.”

FSSAI ने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “खाद्य लेबलिंगमधील प्रामाणिकतेसाठी सक्रिय सहभाग घ्या आणि एक आरोग्यदायी व सुजाण भारत घडविण्यास हातभार लावा.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news