

Sundar Pichai 2024 Salary Package
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे, याबाबत नेहमीच उत्सुकता असते.
आता गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने पिचाई यांच्या पगाराचे आकडे अधिकृतपणे जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, पिचाई यांना जितका पगार मिळतो त्याच्या जवळपास जाणाराच खर्च कंपनी त्यांच्या सुरक्षेसाठीही केला आहे!
अल्फाबेटने जाहीर केलेल्या प्रॉक्सी स्टेटमेंटनुसार, 2024 मध्ये सुंदर पिचाई यांना एकूण 10.7 कोटी डॉलर (सुमारे 92 कोटी रूपये) पॅकेज देण्यात आले. 2023 मध्ये त्यांना 88 लाख डॉलर (75.68 कोटी रूपये) मिळाले होते. म्हणजेच यंदाच्या वर्षी त्यांचा पगार वाढला आहे.
मात्र, आतापर्यंतचा त्यांचा सर्वात मोठा पगार 2022 मध्ये होता. तेव्हा तब्बल 22.6 कोटी डॉलर (1943.60 कोटी रूपये) पगार त्यांना मिळाला होता. जे कोणत्याही सीईओला मिळालेले सर्वात मोठे वार्षिक पॅकेज होते.
सुंदर पिचाई यांना मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी बहुतांश हिस्सा हा स्टॉक्सचा आहे, म्हणजेच कंपनीकडून दिले जाणारे शेअर्स. त्यांची बेसिक सॅलरी देखील लक्षवेधी आहे – त्यांना दरवर्षी 20 लाख डॉलर (17.20 कोटी रूपये) बेसिक सॅलरी दिली जाते.
याव्यतिरिक्त, स्टॉक्स व विविध सुविधांच्या स्वरूपातही त्यांची कमाई मोठ्या प्रमाणावर होते.
गुगलच्या सीईओच्या सुरक्षेसाठी कंपनीने जेवढा खर्च केला आहे, तो थक्क करणारा आहे. 2024 मध्ये अल्फाबेटने सुंदर पिचाई यांच्या सुरक्षेसाठी 82.7 लाख डॉलर (सुमारे71.12 कोटी रूपये) खर्च केले. ही रक्कम 2023 मधील सुरक्षाव्ययापेक्षा 22 टक्के अधिक आहे.
हा खर्च कोणत्याही लक्झरीवर नसून, पूर्णतः सुरक्षेच्या गरजांवर केंद्रित आहे. यामध्ये घराच्या सुरक्षा यंत्रणा, प्रवासादरम्यान संरक्षण, वैयक्तिक ड्रायव्हर यांचा समावेश आहे.
अल्फाबेटचे म्हणणे आहे की, हा खर्च "वैयक्तिक लाभ" न मानता, सीईओ पदाच्या जबाबदाऱ्यांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून केला जातो.
2024 मध्ये गुगलमधील एका सरासरी पूर्णवेळ कर्मचाऱ्याचे वार्षिक उत्पन्न 3,31,894 डॉलर (सुमारे 2.85 कोटी रूपये) होते. हे आकडे 2023 पेक्षा 5 टक्के अधिक आहेत. मात्र, सुंदर पिचाई यांचे वेतन एका सरासरी कर्मचाऱ्याच्या तुलनेत 32 पट जास्त आहे.
सुंदर पिचाई यांनी कंपनीला AI चा विकास, क्लाऊड तंत्रज्ञानाचा विस्तार अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर यशस्वीरित्या पुढे नेले आहे, त्यामुळे त्यांना हे इतके जबरदस्त पॅकेज मिळाले आहे.
टेक उद्योगातील प्रमुख कंपन्यांच्या CEO चे पगार विविध घटकांवर आधारित असतात. ज्यात बेसिक सॅलरी, स्टॉक अवॉर्ड्स, बोनस आणि इतर फायदे समाविष्ट असतात. पुढे 2024 च्या आर्थिक वर्षातील काही प्रमुख टेक कंपन्यांच्या सीईओंचे पगार दिले आहेत-
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना 79.1 मिलियन डॉलर इतका पगार आहे.
ॲपलचे सीईओ टिम कूक यांना 74.6 मिलियन डॉलर इतका पगार आहे.
एनव्हिडियाचे सीईओ जेसनेस हुआंग 34.2 मिलियन डॉलर पगार आहे.
भारतीय टेक कंपन्यांच्या सीईओंचे पगार
भारतीय कंपन्यांमध्ये, HCL Tech चे सीईओ सी. विजयाकुमार हे 2024 मध्ये 84.16 कोटी रूपये पगारासह सर्वाधिक पगार घेणारे भारतीय सीईओ होते. Infosys चे सलील पारेख आणि Wipro चे श्रीनिवास पाल्लिया हे अनुक्रमे 66.25 कोटी आणि ₹50 कोटी पगारासह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते.