पप्पू ते राजकुमार..! : विराेधकांनी हिणवले;पण राहुल गांधींनी नेतृत्त्‍व सिद्ध केलेच

पप्पू ते राजकुमार..! : विराेधकांनी हिणवले;पण राहुल गांधींनी नेतृत्त्‍व सिद्ध केलेच

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही वर्षात भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पप्पू, ट्यूबलाईट, महाज्ञानी, मूर्खांचा नेता, शेहजादे (राजकुमार) अशा अनेक नावांनी खिल्ली उडवली.  गेल्या दशकभरातील प्रत्येक निवडणुकीत विराेधी पक्षाकडून काँग्रेस पक्षासह राहुल गांधींना टार्गेट केले जाते हाेते; पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे नेतृत्व अधोरेखीत झाले आहे.

राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत जोडो यात्रेने त्यांच्या मोहिमेची सुरूवात केली होती. लोकसभेच्या जिंकलेल्या जागांच्या संदर्भात या यात्रेचा काहिसा परिणाम दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा पहिला टप्पा सुरू झालेल्या कन्याकुमारी येथे काँग्रेसला विजय मिळला. तर न्याय यात्रेचा दुसरा टप्पा महिलांवरील अत्याचाराने हादरून गेलेल्या मणिपूर येथून सुरू केला होता. तेथे मतदारांनी भाजपला सपशेल नाकारले. दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडी मिळाली. भारत जोडो यात्रा मार्गावरील त्यांच्या लोकांसोबतच्या संवादाने माध्यमांनी त्यांना लोकांपर्यंत पोहोचवले. राहुल गांधींनी यात्रेदरम्यान समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांशी संवाद साधाला. विद्यार्थ्यांपासून ट्रक ड्रायव्हर्स, मेकॅनिकपर्यंत त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यांची ही एक बाजू त्यांनी दाखवून दिली, जी देशाने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.

प्रियांका गांधीच्या 'त्या' निर्णयाचा फायदाच…

प्रियांका गांधीं या लोकसभा निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी राहुल गांधी यांच्यासह दोघांनीही निवडणूक लढवली तर एकाच मतदारसंघात प्रचारासाठी बांधले जातील. देशभरात काँग्रेसचा प्रचार करता येणार नाही, त्यामुळे लोकसभेला फक्त प्रचार करणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाचा फायदा झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी ६७ रॅली आणि रोड शो केले. यावेळी प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींपेक्षा जास्त सभा घेतल्या. भाजपने गांधी भावंडांची तयार केलेली प्रतिमा बदलण्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना यश मिळाल्याचे चित्र आहे.

काँग्रेसने यावेळी ५४३ पैकी फक्त ३२८ जागा लढवल्या. या आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा आहेत. उर्वरित २१५ जागा इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ही मोठी कामगिरी केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news