नितीश कुमार, तेजस्‍वी यादव एकाच विमानाने दिल्‍लीला रवाना

नितीश कुमार, तेजस्‍वी यादव
नितीश कुमार, तेजस्‍वी यादव

पुढारी ऑनलाईन : लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल काल (मंगळवार) घोषित झाले. या निकालाने सत्‍तेची रस्‍सीखेच सुरू झाली आहे. सत्‍तास्‍थापनेची समीकरणे आकार घेउ लागली आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनी पुन्हा एकदा वेग घेतला आहे. त्‍या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्‍वी यादव एकाच विमानाने दिल्‍लीला रवाना झाले आहेत. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

नुकतीच नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्‍यात कालच्या निकालानंतर आज एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्या दिल्‍लीत बैठका होणार आहेत. त्‍यात नितीशकुमार हे एनडीएच्या बैठकीला उपस्‍थित राहण्यासाठी दिल्‍लीला रवाना झाले तर तेजस्‍वी यादव हे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्‍थित राहण्यासाठी दिल्‍लीला रवाना झाले. नितीश कुमारांना सोबत घेण्याचे इंडिया आघाडी प्रयत्‍न करत असल्‍याची चर्चा सुरू झाली आहे. आज इंडिया आघाडीच्या नेत्‍याची निवड हाेणार असल्‍याचे उद्‍धव ठाकरे यांनी सांगितले हाेते. उद्‍धव ठाकरे यांनी भाजपने ज्‍यांना त्रास दिला ते नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे आमच्याकडे येतील असे सांगून इंडिया आघाडीच्या सत्‍तेच्या हालचालींचे संकेत दिले होते.

नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी साथ दिल्‍यास इंडिया आघाडीची सत्‍ता स्‍थापण करू असा विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी व्यक्‍त केला आहे. त्‍यात आज नितीशकुमार आणि तेजस्‍वी यादव एकाच विमानाने दिल्‍लीला रवाना झाल्‍याने चर्चांना उघाण आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news