गुजरात ATS ची मोठी कारवाई, ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या चार दहशतवाद्यांना अटक.
अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या चार दहशतवाद्यांना अटक.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात एटीएसने दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला आहे. अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चारही दहशतवादी श्रीलंकेचे नागरिक आहेत, अशी माहिती गुजरात एटीएस (ATS) ने दिली आहे.

गुजरात पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ दहशतवाद्यांना श्रीलंकेतून भारतात मोठा घातपात करण्यासाठी पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अहमदाबाद येथून टार्गेटेड ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. हे दहशतवादी पाकिस्तानातून येणाऱ्या त्यांच्या हस्तकांच्या आदेशाची वाट पाहत होते, अशीही माहिती समोर आली आहे.

या दहशतवाद्यांच्या फोनमधील एनक्रिप्टेड चॅट्स एटीएसच्या हाती लागले आहे. गुजरातमध्ये ISIS च्या चार दहशतवाद्यांना अटक अशा वेळी झाली आहे जेव्हा सूरत पोलिस आधीच मौलवी सोहेल अबुबकर प्रकरणाचा तपास करत आहेत. दिल्लीप्रमाणेच अहमदाबादमधील ३६ शाळांनाही बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. या तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसली तरी हे दहशतवादी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

गुजरात एटीएसने चारही दहशतवाद्यांना एका गुप्त ठिकाणी नेले असून त्यांची चौकशी सुरू आहे. गेल्या वर्षी, पोलिसांनी पोरबंदरमधून काही ISIS संशयितांना अटक केली होती आणि त्यांच्या इंडिया मॉड्यूलचा भांडाफोड केला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news