Sweet Shop Video: मिठाईवर माशांचा थर, तरीही ग्राहकांची खरेदी सुरूच; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Haryana Sweet Shop Food Safety Video: हरियाणातील भिवानी शहरात एका मिठाईच्या दुकानातील धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sweet Shop Video Flies
Sweet Shop Video FliesPudhari
Published on: 
Updated on: 

Haryana Sweet Shop Food Safety Video: हरियाणातील भिवानी शहरातील एका मिठाईच्या दुकानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुकानात उघड्यावर ठेवलेल्या मिठाईवर मोठ्या प्रमाणात माशा बसल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, मिठाईवर माशा घोंगावत असतानाही ग्राहक तिथून खरेदी करत आहेत. या प्रकारामुळे दुकानातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हा प्रकार भिवानी येथील जुन्या बसस्थानकाजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. दुकानाबाहेर टेबलवर मिठाईचे अनेक ट्रे ठेवण्यात आले होते. या ट्रेवर पांढरे कापड अंथरले होते. मात्र, मिठाई उघडीच असल्याने त्यावर मोठ्या संख्येने माशा बसत होत्या. माशा मिठाईभोवती घोंगावत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओ करताना त्याने म्हटले, "हे जुन्या बसस्थानकाजवळचे दुकान आहे. या माशा पाहा." विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार सुरू असतानाही दुकानाबाहेर ग्राहकांची गर्दी होती. लोक मिठाई खरेदी करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Sweet Shop Video Flies
Ramayana Box Office Collection Day 4: दिवाळीत 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! कमाईचा नवा विक्रम; चार दिवसांत किती कोटी कमावले?

'नालंदा इंडेक्स' या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी दुकानातील स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच अन्नसुरक्षा विभाग अशा दुकानांची तपासणी करतो का, असा प्रश्नही उपस्थित केला.

या व्हिडीओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने म्हटले की, "लोक अजूनही ही मिठाई खरेदी करून खात आहेत. आपल्या देशात अन्नसुरक्षेची थट्टा सुरू आहे." तर काहींनी मिठाईवर माशा बसत असतानाही ग्राहक खरेदी कशी करू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला.

Sweet Shop Video Flies
Prithvi Shaw Birthday: पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; वाढदिवशी आकृतीची खास पोस्ट, म्हणाली, 'माझ्या आवडत्या व्यक्तीला...'

मिठाईसारखे खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवल्याने त्यावर माशा बसू शकतात. अशा अन्नपदार्थांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे दुकानदारांनी खाद्यपदार्थ झाकून ठेवणे आणि दुकानात स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

तसेच अन्नसुरक्षा विभागानेही अशा दुकानांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. या घटनेनंतर संबंधित दुकानावर काही कारवाई झाली आहे का, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.