
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी धडधडत असलेल्या प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. देशभरातील ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४९ मतदारसंघांमध्ये सोमवारी, २० मे रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह स्मृती इराणी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचे भवितव्य 'ईव्हीएम 'मध्ये बंद होणार आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेलीत राहुल गांधी यांचा सामना भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्याशी आहे. अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांची लढत काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांच्याशी आहे. लखनौमध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापुढे सपचे रविदास मेहरोत्रा यांचे आव्हान आहे.
कैसरगंजमध्ये वादग्रस्त खासदार बृजभूषण सिंह यांचे पुत्र करणभूषण सिंह मैदानात आहेत. त्यांची लढत सपचे राम भगत मिश्रा आणि बसपचे नरेंद्र पांडे यांच्याशी आहे. बिहारच्या सारण मतदारसंघात राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य नशीब आजमावत आहेत. त्यांची लढत भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांच्याशी आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांची लढत पीडीपीचे फैयाज अहमद मीर यांच्याशी आहे.
हेही वाचा :