Farooq Abdullah Firing Video: मला २० वर्षापासून त्यांना मारायचं होतं.... फारूख अब्दुल्लांवर फायरिंग करणाऱ्या हल्लेखोरानं दिली धक्कादायक माहिती

फारूख अब्दुल्ला फायरिंगचा थरारक व्हिडिओ, अब्दुल्लांविषयी महत्वाची माहिती आली समोर
Farooq Abdullah Firing Video
Farooq Abdullah Firing Videopudhari
Published on
Updated on

Farooq Abdullah Firing Video : जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांच्यावर एका कार्यक्रमात गोळबार करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी प्रसांगावधान राखून हल्लेखोराला त्वरित ताब्यात घेतलं आहे. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर येत आहे.

Farooq Abdullah Firing Video
जम्मू-काश्मीर विशेष दर्जासाठी बलिदान हवे, फारूख अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्‍तव्य

हल्लेखोराचा धक्कादायक खुलासा

जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हे एका कार्यक्रमाला गेले होते. तिथून जात असतानाच एक हल्लेखोर मागून आला अन् त्यानं आपल्या खिशातील पिस्तूल काढून फारूख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसांगावधान राखून या हल्लेखोराला त्वरित ताब्यात घेतलं. याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ६३ वर्षाच्या हल्लेखोरानं पोलिसांना सांगितलं की, 'मला गेल्या २० वर्षापासून फारूख अब्दुल्लांना मारायचं होतं. हा माझा वैयक्तिक अजेंडा आहे. मी आज तो प्रयत्न केला मात्र मी अपयशी ठरलो. हे शस्त्र माझं वैयक्तिक शस्त्र आहे. ते माझ्या नावावरच आहे.' या वृद्ध हल्लेखोरानं तो कोणतेही काम करत नाही असं देखील सांगितलं.

Farooq Abdullah Firing Video
Horoscope 12 March 2026: आज 'या' राशीच्या व्यक्तींचा कामात उत्साह, आत्मविश्वास वाढेल; नवे निर्णय घेण्याची संधी मिळेल

मोठी माहिती आली समोर

तसेच या हल्ल्यानंतर एक महत्वाची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना फारूख अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी उपस्थित असलेल्या कार्यक्रमात झाली. या प्रकरणी आतापर्यंत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Farooq Abdullah Firing Video
Sangli Crime : अश्लील व्हिडिओ व्हायरलच्या धमकीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ही खूप शरमेची गोष्ट

दरम्यान, फारूख अब्दुल्लांवर हल्ला झाल्यानंतर जम्मू काश्मीर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजिंदर पाल सिंग अमन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'ही खूप दुःखद घटना आहे. ज्या वक्तीनं ही कृती केली आहे तो जेलमध्ये आहे. आम्ही परमेश्वराकडे डॉक्टर साहेब (फारूख अब्दुल्ला) सुरक्षित असतील अशी प्रार्थना करतो.'

ते पुढे म्हणाले, 'एवढी सुरक्षा असतानाही ही घटना घडली हे खूप वेदनादायी आहे. तो व्यक्ती त्याच्या पिस्तुलासह तिथं पोहचला होता. काही काळापूर्वी फारुख अब्दुला यांची सुरक्षा कमी केली आहे. एवढ्या चांगल्या नेत्यावर जीवघेणा हल्ला व्हावा ही आपल्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खूप शरमेची गोष्ट आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news