Sangli Crime : अश्लील व्हिडिओ व्हायरलच्या धमकीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सांगली ग्रामीण पोलिसांत एकावर गुन्हा दाखल
Sangli Crime News
अश्लील व्हिडिओ व्हायरलच्या धमकीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार Pudhari File Photo
Published on
Updated on

सांगली : अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित मिलिंद भुई (रा. उदगाव, जयसिंगपूर) याच्याविरुद्ध सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही 16 वर्षीय असून ती शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर 2025 च्या दरम्यान संशयित मिलिंद याने पीडितेला तिच्या गावातील एका मंदिराजवळ गाठून तिचा अश्लील व्हिडिओ केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केले. आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचेही तिने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news