Falta Election Result |फाल्टाच्या 'पुष्पा'ला मतदारांनी झुकवले! अभिषेक बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय

देबांग्शु पांडा १ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने दणदणीत विजय
Falta Election Result |फाल्टाच्या 'पुष्पा'ला मतदारांनी झुकवले! अभिषेक बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
Published on
Updated on

Falta Election Result

कोलकाता : पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघासाठी आज (दि. २४) सकाळपासून सुरू असलेली मतमोजणी आता पूर्ण झाली आहे. ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे खंदे समर्थक मानले जाणारे जहांगीर खान यांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार देबांग्शु पांडा यांनी १ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.

जहांगीर खान यांनी घेतली होती उमेदवारी मागे

विशेष म्हणजे, जहांगीर खान यांनी २१ मे रोजी झालेल्या फेरमतदानाच्या अगदी आधी आपली उमेदवारी मागे घेतली होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून गेल्यामुळे ईव्हीएम (EVM) मशीनवर त्यांचे नाव कायम होते, ज्यामुळे त्यांना ७ हजारांहून अधिक मते मिळाली. जहांगीर खान यांना 'फलताचा पुष्पा' म्हणूनही ओळखले जाते. फाल्टा विधानसभा मतदारसंघ हा डायमंड हार्बर लोकसभा क्षेत्रांतर्गत येतो आणि डायमंड हार्बर हा अभिषेक बॅनर्जींचा बालेकिल्ला मानला जातो.

Falta Election Result |फाल्टाच्या 'पुष्पा'ला मतदारांनी झुकवले! अभिषेक बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
West Bengal | वंगच्या ‘माटी’मध्ये झेंडा भाजपचाच!

सुरवातीपासूनच भाजपची आघाडी

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली होती. जहांगीर खान यांची स्थिती इतकी खालावली की ते सीपीआयएम (CPIM) आणि काँग्रेस उमेदवाराच्याही मागे पडले आणि थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपच्या देबांग्शु पांडा यांनी १,०९,०२१ (एक लाख नऊ हजार एकवीस) मतांच्या फरकाने हा विजय मिळवला.पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान फलत्यातील अनेक मतदान केंद्रांवर फेरफार आणि घोटाळ्याचे आरोप झाले होते. अनेक ईव्हीएमवरील भाजपच्या चिन्हावर टेप लावून ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भाजपने याविरोधात तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने फाल्टामध्ये फेरमतदानाचे आदेश दिले आणि २१ मे रोजी या जागेवर पुन्हा मतदान घेण्यात आले.

Falta Election Result |फाल्टाच्या 'पुष्पा'ला मतदारांनी झुकवले! अभिषेक बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
Manoj Tiwary | "माझ्‍यासाठी तृणमूलचा चॅप्‍टर संपला" : विधानसभा तिकिटासाठी ५ कोटी मागितल्याचा माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक आरोप

...म्हणून नाव पडले 'पुष्पा'

जहांगीर खान यांनी बंगाल निवडणुकीदरम्यान आपली प्रतिमा 'पुष्पा' चित्रपटातील नायकासारखी बनवली होती. ते अनेकदा 'झुकेगा नही' अशा थाटात वक्तव्ये करायचे. उत्तर प्रदेशचे आयपीएस अधिकारी अजयपाल शर्मा यांच्याशी झालेल्या एका वादानंतर त्यांना उत्तर देताना खान म्हणाले होते, "ते जर सिंघम असतील, तर मी पुष्पा आहे." तेव्हापासून जहांगीर खान यांना 'फाल्टा पुष्पा' म्हटले जाऊ लागले आणि प्रसारमाध्यमांमध्येही त्यांची याच नावाने चर्चा होऊ लागली.

Falta Election Result |फाल्टाच्या 'पुष्पा'ला मतदारांनी झुकवले! अभिषेक बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
Donald Trump: "भारताचे नशीबच की मोदींसारखा नेता मिळाला"; बंगालमधील विजयानंतर ट्रम्प यांच्याकडून मोदींचे अभिनंदन; काय म्हणाले?

फलत्याच्या मतदारांचे आभार: शुभेंदु अधिकारी

देबांग्शु यांच्या विजयानंतर बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर (TMC) कडाडून टीका केली आहे. त्यांनी 'एक्स'वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "बदनाम झालेला 'डायमंड हार्बर' मॉडेल आता 'तृणमूलच्या पराभवाचे' मॉडेल बनले आहे. आधी फाल्टातील जनतेला नतमस्तक होऊन प्रणाम करतो. त्‍यांनी फाल्टा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देबांग्शु यांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रचंड कौल दिला आहे. मी फलत्याच्या मतदारांचा विशेष ऋणी आहे. मी त्यांना भाजप उमेदवाराचा विजय १ लाख मतांच्या फरकाने निश्चित करण्याचे आवाहन केले होते, आणि हा विजय १ लाख ८ हजारांपेक्षाही अधिक मतांनी झाला आहे. आम्ही विकासाच्या माध्यमातून या ऋणाची परतफेड करू. आम्ही एक 'सुवर्ण फलता' बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत."

Falta Election Result |फाल्टाच्या 'पुष्पा'ला मतदारांनी झुकवले! अभिषेक बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
West Bengal Bjp Strategy: पश्चिम बंगाल जिकलं! भाजपची रणनिती काय होती?

फलत्याच्या निकालावरून अभिषेक बॅनर्जींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

फाल्टाच्या निकालावर अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर (EC) निशाणा साधला आहे. फेरमतदानाच्या मतमोजणीत अनेक मोठ्या विसंगती समोर आल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, "आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत सर्व २१ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली होती. तर ४ मे रोजी याच वेळेपर्यंत केवळ २ ते ४ फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. देश यावर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरणाचा जबाबदार आहे. गेल्या १० दिवसांत फलत्यातील १००० हून अधिक कार्यकर्त्यांना आपली घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडले गेले, तरीही निवडणूक आयोगाने याकडे डोळेझाक केली. आदर्श आचारसंहिता लागू असतानाही दिवसाढवळ्या पक्षाच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news