facebook policy : फेसबुकवर आता राजकीय नेत्यांची खिल्ली उडवणे पडणार महागात !

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

फेसबुक आता लैंगिक सामग्री पोस्ट करणाऱ्या खात्यांवर बंदी घालणार आहे. कंपनीने आपले धोरण अपडेट (facebook policy) केले आहे. या अंतर्गत जर एखाद्या युझर्सने सेलिब्रिटीज, राजकारणी, क्रिकेटपटू आणि पत्रकार अशा सार्वजनिक व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यामध्ये, युझर्सचे प्रोफाईल, पेज, ग्रुप किंवा इव्हेंट कायमचा काढून टाकला जाईल.

सोशल मीडियावर अनेक युझर्स बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांच्या मिम्स बनवतात आणि शेअर करतात असे अनेकदा दिसून येते. आता असे विनोद करणे लोकांना भारी पडू शकते.

फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी हेड अँटीगोन डेव्हिस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जे युझर्स लोकांची प्रतिमा डागाळतात आणि ऑनलाईन त्रास देतात त्यांना कठोरपणे हाताळले जाईल. कंपनीने धोरणात बदल करून सार्वजनिक व्यक्ती आणि वैयक्तिकमधील फरक हायलाईट केला आहे, जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची योग्य अंमलबजावणी होऊ शकेल.

facebook policy : थेट संदेश पाठवण्याच्या नियमांमध्ये बदल होईल

फेसबुक लोकांना एकत्रितपणे लक्ष्य करणाऱ्या पोस्ट काढून टाकेल. यासह, इनबॉक्समध्ये थेट संदेश पाठवण्याचे नियम देखील बदलले जातील. कंपनी प्रोफाईल आणि पोस्टवरील कमेंट अधिक सुरक्षित करणार आहे. सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध लोकांची फेसबुक यादी करेल असे फेसबुकने म्हटले आहे.

facebook policy : चुकीच्या पोस्ट थांबवणाऱ्या टीमला बाजूला ठेवून फेसबुक वादात सापडले

फेसबुकचे पॉलिसी अपडेट त्याचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेन यांच्या खुलाशानंतर आले आहे. टाइम मासिकाने हॉगेनचे खुलासेही प्रकाशित केले होते. असे सांगण्यात आले की फेसबुकने सोशल मीडियावरील चुकीच्या माहिती आणि द्वेषयुक्त पोस्टविरोधात लढणाऱ्या टीममधील सर्व सदस्यांना बाजूला केले आहे.

फेसबुकने डिसेंबर 2020 मध्ये ही टीम काढून टाकली. हॉगेनने असेही म्हटले की कंपनीने आपले अंतर्गत सर्वेक्षण देखील लपवले, ज्यावरून हे दिसून आले की इंस्टाग्राम अल्गोरिदम तरुणांच्या मनावर कसा नकारात्मक परिणाम करत आहे.

फेसबुकने 1,259 अकाउंट, पेज आणि ग्रुपवर बंदी घातली आहे जी सार्वजनिक डिबेटमध्ये मुद्दाम काडी टाकतात. फेसबुकने इराणमधील 93 अकाउंट, 14 पेज, 15 ग्रुप आणि 194 इंस्टाग्राम खाती काढून टाकली आहेत. त्यांनी प्रामुख्याने घरगुती युझर्सना लक्ष्य केले. या महिन्यात फेसबुकने सुदान आणि इराणमध्येही कारवाई केली आहे. फेसबुकने सुदानमधील 116 पेज, 666 अकाउंट, 69 ग्रुप आणि 92 इन्स्टाग्राम खाती काढून टाकली आहेत.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news