Shocking Train Incident |भयंकर... पोटच्‍या मुलीला आईने रेल्‍वेसमोर ढकलले, 'तिला वाचवू नका' म्हणत मदत करणार्‍यांनीही रोखले!

Shocking Train Incident | नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर थरार, कृत्य सीसीटीव्हीत कैद
Shocking Train Incident
प्रतीकात्मक छायाचित्र.Pudhari Photo.
Published on
Updated on

Shocking Train Incident

भोपाळ : मध्य प्रदेशातील नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर मंगळवारी (दि. १९) संध्याकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. येथे एका आईने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला चालत्या रेल्वेसमोर ढकलून दिले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या ही चिमुकली मृत्यूशी झुंज देत आहे.

आईने अचानक मुलीला रुळावर ढकलेले

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संबंधित महिला सरकारी कर्मचारी आहे. ती माळखेडा भागात राहते. पतीच्या निधनानंतर तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. ही मायलेकी रेल्वे स्थानकावर सुमारे तीन तास थांबल्या होत्या. मंगळवारी संध्याकाळी ७:४० च्या सुमारास जेव्हा तामिळनाडू एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली, तेव्हा महिलेने अचानक मुलीला रुळावर ढकलले. मुलगी इंजिनला धडकली आणि प्लॅटफॉर्म व रुळांच्या मधल्या जागेत अडकली.

Shocking Train Incident
Mother Killed Daughter: आई झाली हैवान! निष्पाप मुलीचं कुऱ्हाडीनं शीर केलं धाडावेगळं; ब्लॅक मॅजिकचा संशय?

'तिला वाचवू नका' : आईचे धक्कादायक विधान

रेल्वे निघून गेल्यानंतर उपस्थित प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी मदतीसाठी धावले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लोक मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तिची आई वारंवार ओरडून सांगत होती की, "तिला वाचवू नका!"

Shocking Train Incident
Shocking Crime News: लाँग ड्राईव्ह वेळी झाला वाद... CA ने पत्नीचा थेट कात्रीनंच गळा चिरला... पोलिसांनी १८ तासात कसा छडा लावला?

रेल्‍वेच्‍या धडकेत मुलगी गंभीर जखमी

रेल्वेच्या धडकेमुळे मुलीच्या डोक्याला, कंबरेला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवून भोपाळला हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, मुलीची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे.

Shocking Train Incident
Hyderabad Shocking News: आई आहे की सैतान... १४ महिन्याच्या मुलीचा उशीने तोंड दाबून घेतला जीव; रमजानमध्ये पतीसोबत झाला वाद

महिला मनोरुग्‍ण असण्‍याची शक्‍यता

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात महिलेला मानसिक आजार असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, असेही पोलिसांनी सांगितले. पोलीस आता तिच्या उपचारांच्या कागदपत्रांची पडताळणी करत असून कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news