

ESIC New Rules: केंद्र सरकारने कर्मचारी राज्य वीमा निगम अर्थात ESIC अंतर्ग येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट दिली आहे. सरकारने आपला जवळपास ७६ वर्षापूर्वीचा एक नियम बदलला आहे. सरकारने कर्मचारी राज्य वीमा विनियम १९५० मध्ये बदल केला असून आता नवीन नियमानुसार पात्र वीमाधारक कर्मचाऱ्यांना आजरपण आणि मातृत्वाचे लाभ घेण्यासाठी वेगवेगळे क्लेम फाईल करण्याची गरज उरणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना ESIC थेट त्यांच्या बँक खात्यात लाबाचे पैसे जमा करणार आहे. तसेच कामावर असताना दुखापत झाल्यावर मिळाणाऱ्या लाभाबाबत देखील क्लेम प्रक्रिया सोपी केली आहे.
नव्या कर्मचारी राज्य वीमा नियमन २०२६ अंतर्गत आजारपण आणि मातृत्वाच्या लाभासाठीचे क्लेम आता ऑटोमेटिक पद्धतीने प्रोसेस करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी वेगळ्या अर्जाची गरज लागणार नाही. पात्र क्लेम थेट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे प्रोसेस केले जाणार आहेत. यामुळे कागदी घोडे नाचवणे कमी होणार आहे. तसेच थेट कॅशचा लाभ मिळवणे सोपे होणार आहे.
मात्र यासाठी तीन अटी देखील घातल्या आहेत. पहिली अट म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट ESIC च्या सूचना तंत्राद्वारे जनरेट झालेले असावे. तसेच वीमाधार आपल्या पोर्टलच्या माध्यमातून आवश्यक मासिक रिटर्न जमा करावे. तसेच कर्मचाऱ्यांजवळ आधार लिंक बँक अकाऊंट असावे, ज्याला त्यांचा इंश्युरन्स नंबर देखील लिंक असला पाहिजे.
सरकारने ESIC सदस्यत्वासाठी वेतन सीमा देखील अधिसूचित केली आहे. सामान्य कर्मचाऱ्यांसाठी ही सीमा २१ हजार रूपये प्रती महिना पगार आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार रूपये प्रती महिना पगार अशी कॅप ठेवली आहे. कर्मचाऱ्यांच्या वीमासाठीच्या योगदानात कोणता बदल करण्यात आलेला नाही.