

NPS Rule Change: पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) नॅशनल पेन्शन सिस्टमच्या अकाऊंट ओपनिंगच्या नियमात बदल केले आहे. आता ती प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. हा बदल नॉन रेसिडेंट इंडियन (NRI) खलाशी यांच्यासाठी करण्यात आला आहे. आता यांच्यासाठी केवायसी बाबत दिलासा देण्यात आला आहे. आता NRI खलाश्यांना आपला पत्त्याचा पुरावा देण्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाहीये.
या खात्यांना होणार नवीन नियम लागू
१३ नोव्हेंबर २०२६ च्या एका सर्क्युलरनुसार पेशन फंड रेग्युलेटर अथॉरिटीने सांगितलं की रेग्युलेटेड एंटीटीजला सीफेयरर वर्क प्रोफाईल असणाऱ्या एनआरआय सब्सक्राईबरसाठी पत्त्याचा पुराव्याच्या स्वरूपात एम्प्लॉयमेंटशी संबंधीत कागदपत्रे स्विकारावे लागणार आहेत. नियमातील हा बदल nps tier 1 अकाऊंट ओपनिंगवर लागू होणार आहेत. पीएफआरडीएच्या या निर्णयामुळे जहाजांवर काम करणाऱ्या लोकांना सरकारी स्कीममध्ये खाते उघडण्यास मदत होणार आहे. ज्या ग्राहकांना अकाऊंट ओपन करताना नेहमी परदेशात असलेल्या रहिवाशी पत्त्याचे प्रुफ देण्यास अडचण निर्माण होत होती.
NRI खलाश्यांना कोणती कागदपत्रे करावी लागणार जमा
NPS च्या बदलेल्या नियमानुसार आता NRI खलाश्यांना पुरावा म्हणून शिपिंग कंपनीसोबत असलेले एक वैध एम्प्लॉयमेंट कान्ट्रॅक्ट द्यावे लागणार आहे. हा पर्याय त्या खलाशांसाठी उपलब्ध आहे जे नव्या कॉन्ट्रॅक्टवर आहेत.
दुसरा पर्याय म्हणजे कंटिन्युएस डिस्चार्ज सर्टिफिकेट (CDC) हा आहे. मात्र यात एक अट असून डिसएम्पार्केशन स्टॅम्प हा सहा महिन्यापेक्षा जुना नसावा. हे डॉक्युमेंट सब्सक्राईबरला एम्पलॉयमेंट आणि नॉन रेसिडेंट स्टेटस पक्का करण्यास मदत करतात. त्यामुळे एनपीएस ऑनबोर्डिंग असताना ओव्हरसीज पत्त्याचा पुरावा देण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.
खलाशी जहाजावर असले तर?
PFRDA त्या खलाशांसाठी पत्त्याच्या पुराव्याबाबतची प्रक्रिया सुलभ केली आहे जे सध्या जहाजावर आहेत. अशा प्रकरणात सब्सक्राईबर आपला सध्याचा पत्ता म्हणून आपल्या एम्प्लॉयरचा परदेशातील पत्ता किंवा आपला भारतीय पत्ता देऊ शकतात. यामुळे NRI खलाशांसाठी अकाऊंड उघडण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.